आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दत्तकविधान सोहळ्यानंतर यदुवीर गोपाल राज उर्स मैसूरच्या संस्थानाचे नवे वारसदार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेंगळुरू - यदुवीर गोपाल राज उर्स यांची आज मैसूरच्या राजघराण्याचा नवीन वारस म्हणून घोषणा करण्यात आली. महाराणी प्रमोद देवी यांनी त्यांना औपचारिकरित्या दत्तक घेतल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. प्रमोद देवी या दिवंगत महाराज श्रीकांतदत्त नरसिंहराज वडियार यांच्या पत्नी आहेत.
अखेरचे महाराज जयचमराजेंद्र वडियार यांच्या ज्येष्ठ कन्या राजकुमारी गायत्री देवी यांचे यदुवीर हे नातू आहेत. कौटुंबीक परंपरेनुसार हा दत्तकविधान सोहळा संपन्न झाला. माझ्या या निर्णयाने माझे दिवंगत पती नक्कीच आनंदी असतील अशी अपेक्षा यावेळी भावूक झालेल्या महाराणी प्रमोद देवी यांनी व्यक्त केल्या. महाराजांच्या बहिणी आणि नातेवाईकांशी सल्लामसलत करून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

वडियार राजघराण्याचे अखेरचे वारसदार श्रीकांतदत्त नरसिंहराज यांचा 10 डिसेंबर 2013 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. ते जयचमराजेंद्र वडियार यांचे एकुलते एक सुपुत्र होते. या दत्तक सोहळ्यानंतर यदुवीर यांचे नामकरण यदुवीर कृष्णदत्त चमराजा वडियार असे करण्यात आले.

वडियार राजघराण्याचे मैसूरच्या संस्थानावर 1399 ते 1947 दरम्यान राज्य होते. अखेरचे महाराज जयचमराजेंद्र वडियार हे 1940 पासून स्वातंत्र्यापर्यंत म्हणजे 1947 पर्यंत राजे होते. त्यानंतर संस्थाने खालसा करण्यात आली.