आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yakub Memon Are Wrong And Want To Divide Society Azam Khan

याकूबला फाशी : ओवेसी नाराज, आजम म्हणाले - देशाला वाटण्याचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - याकूब मेमनला झालेल्या फाशीवर राजकारण सुरु झाले आहे. एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसींनी फाशीवर नाराजी व्यक्त केली आहे, तर उत्तर प्रदेशचे मंत्री आजम खान यांनी इशाऱ्या-इशाऱ्यातून ओवेसींवर निशाना साधला आहे. ते म्हणाले, जे लोक या शिक्षेला विरोध करत आहेत, ते देशाची विभागणी करण्याचा प्रयत्न करत आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते ही सगळी उठाठेव 2017 मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश निवडणुकीसाठीची आहे. ओवेसी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीत पूर्ण ताकदीने उतरण्याच्या तयारीत आहेत. ओवेसींमुळे समाजवादी पक्षाच्या एकगठ्ठा मुस्लिम मतांना धक्का पोहोचू शकतो.
काय म्हणाले आजम खान
खान म्हणाले, 'जे लोक याकूबला पाठिंबा देत आहेत, ते या देशाची फाळणी करु इच्छित आहेत. काही लोक असे वक्तव्य करत आहे, ज्यामुळे त्याचा धर्म समोर येईल. हे देशासाठी वाईट आहे. कायदा सर्वोच्च आहे.'

ओवेसी काय म्हणाले
ओवेसी म्हणाले, 'न्याय झालेला नाही. मुंबई स्फोटांतील दोषीना शिक्षा झाली पाहिजे. मात्र बाबू बजरंगी, माया कोडनानी, कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंह यांनाही फाशी झाली पाहिजे. फाशी देणे हाच जर न्याय असेल तर या लोकांनाही फाशी झाली पाहिजे.' ओवेसी म्हणाले, की मी याकूबची बाजू घेत नाही. पण नेहमी आमच्यावरच अन्याय होतो. बेअंतसिंहच्या गुन्हेगारांना धर्माच्या नावावर वाचवण्यात आले. राजीव गांधींच्या हत्याऱ्यांचे काय झाले. बाबरी मशिद पाडणाऱ्यांना फाशी का नाही, असे सवाल त्यांनी उपस्थित केले. ते म्हणाले, 'याकूबने तर भारतीय तपास यंत्रणांना मदत केली. त्याने आपल्या भावाच्या विरोधात पुरावे दिले. गुजरात दंगलीतील दोषिंना सरकार का फासावर लटकवत नाही?'

इतर राजकीय पक्षाचे नेते काय म्हणाले

भाजप प्रवक्ते एम.जे. अकबर म्हणाले - मला दुःख होते की काही लोक असा विचार करतात. आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे. सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे. तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करु शकत नाही. निर्णय सर्वांसाठी आणि सर्वांच्या हक्कांसाठी आहे. मला नाही वाटत यात काही घाई झाली आहे. 22 वर्षांनी निर्णय आला आहे, त्यामुळे त्यात घाई झाली असे म्हणता येत नाही.
केंद्र आणि राज्यात दोन्ही ठिकाणी भाजपचे सरकार आहे. सरकारने फाशी देण्यात घाई केली. दया याचिका रद्द करण्यासाठी राष्ट्रपतींना पूरेसा वेळ मिळाला नाही. सरकारने दबाव टाकला होता. सुप्रीम कोर्टाने घाईगडबडीत निर्णय घेतला. 21 वर्षे वाट पाहिली आता आणखी 21 दिवस वाट पाहाण्यास काय हरकत होते.
- माजिद मेमन, राष्ट्रवादी काँग्रेस

याकूबला फासावर लटकवून केंद्र सरकार आणि न्याय व्यवस्थेने एक उदाहरण घालून दिले आहे. आशा आहे, की आता जाती-धर्माच्या पलिकडे जाऊन निर्णय घेतले जातील. परंतू तशी शक्यता कमीच आहे.
- दिग्विजयसिंह, काँग्रेस
याकूबच्या फाशीबद्दल वाईट वाटते. याकूब स्वतःहून चालत आला होता. तो शरण आला होता. रॉ अधिकारी बी. रमण यांनी लिहिलेला लेख वाचल्यानंतर हे जे काही झाले ते चूकीचे असल्याचे वाटते. याकूब आणि दाऊदने बॉम्बस्फोट का केले याचाही शोध घेतला पाहिजे.
अबू आझमी, समाजवादी पार्टी