आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशवंत सिन्हा चर्चेसाठी दुसऱ्यांदा काश्मीर दौऱ्यावर, पहिल्या दौऱ्यातील चर्चेचा अहवाल केंद्राला अगोदरच सुपूर्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - माजी केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते यशवंत सिन्हा शनिवारी पाचसदस्यीय शिष्टमंडळासह काश्मीरमध्ये दाखल झाले. दोन महिन्यांतील त्यांचा हा दुसरा काश्मीर दौरा आहे. ते आपल्या दौऱ्यात फुटीरवाद्यांशी चर्चा करणार आहेत.

काश्मीर दौऱ्यात ते हुर्रियत नेते आगा सईद हुसैन यांची भेट घेतील. सिन्हा यांनी ऑक्टोबरमध्ये फुटीरवाद्यांची भेट घेतली होती. त्या दौऱ्यातील संभाषण, बैठकांचा सविस्तर अहवाल केंद्र सरकारकडे सोपवण्यात आला आहे. त्याच मुद्द्यावर ते पुन्हा काश्मीर दौऱ्यावर आले आहेत. परंतु त्याच मुद्द्यावर केंद्र सरकारच्या चमूने फुटीरवाद्यांशी चर्चा केली नव्हती. त्यांच्यासाठी नेत्यांनी दरवाजेदेखील बंद ठेवले होते.

दहशतवाद्याच्या मृत्यूनंतर दोन जिल्हे बंद, निदर्शने
दक्षिण काश्मीरमधील दोन जिल्हे अनंतनाग तसेच कुलगाममध्ये शनिवारी बंद ठेवण्यात आला होता. दहशतवाद्यांच्या खात्म्यानंतर बंदचे आवाहन करण्यात आले होते. मृत्यूवर नाराज लोकांनी सुरक्षा दलावर दगडफेक केली. त्यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. शनिवारी दोन्ही जिल्ह्यांतील बाजारपेठ तसेच वाहतूक ठप्प होती. सकाळपासूनच नाराज लोक रस्त्यावर उतरले होते. ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. पुढे सुरक्षा दलाने त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. तीन दिवसांपूर्वी अनंतनागच्या हुसैन पोरामध्ये लष्करच्या कमांडरसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. तीन दहशतवाद्यांची शस्त्रे जप्त करण्यात आली होती. तेव्हा तीन दिवस चकमक उडाली होती. त्यात एका दहशतवाद्याचा जिवंत जळून मृत्यू झाला होता. स्थानिक दहशतवाद्यांचे मृतदेह मिळाले आहेत. त्यांच्यावरील अंत्यसंस्काराच्या वेळी समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलाच्या विरोधातील संताप व्यक्त करण्यासाठी दोन्ही जिल्ह्यांत बंद पुकारण्यात
आला होता.

अनेक नेते ताब्यात
सुरक्षा दलाने ९ फुटीरवादी नेत्यांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये इंजिनिअर रशीदचाही समावेश आहे. हे नेते शनिवारी माेर्चा काढण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे राज्यातील परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता होती.
बातम्या आणखी आहेत...