आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yasin Bhtkal Get 20 Days Custody In The Case Of Hyderabad Blast

हैदराबाद स्फोटप्रकरणी यासीन भटकळला 20 दिवस कोठडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - हैदराबाद येथील दिलसुखनगरच्या दुहेरी बॉम्बस्फोटप्रकरणी इंडियन मुजाहिदीनचा सहसंस्थापक यासीन भटकळला स्थानिक न्यायालयाने 17 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. भटकळला सोमवारी कडक सुरक्षेत राष्‍ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) न्यायालयात उभे केले.


अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी आरोपीला नाव व गाव विचारले, तेव्हा त्याने यासीन भटकळ आणि कर्नाटकातील भटकळ गावचा असल्याचे सांगितले. भटकळच्या अटकेनंतर दिल्ली न्यायालयाने 21 रोजी त्याला दोन दिवसांचा ट्रांझिट रिमांड दिला होता. एनआयए पथकाने त्याला रविवारी हैदराबादेत आणले. दिलसुखनगर बॉम्बस्फोट प्रकरणात यासीन आरोपी क्रमांक पाच आहे. भटकळचा साथीदार असदुल्लाह अख्तरची गेल्या गुरुवारी 15 दिवसांच्या एनआयए कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दिलसुखनगरमधील कोणार्क व वेंकटाद्री भागात शक्तिशाली स्फोट झाले होते. भटकळ आणि असदुल्लाह यांची देशात स्फोट घडवून आणण्याची योजना होती, मात्र त्याआधी सुरक्षा संस्थांनी भारत-नेपाळ सीमेवर त्यांच्या मुसक्या आवळल्या.