आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑटोग्राफने सुरु झाली या पाकिस्तानीची Love Story, पती आहे फुटिरतावादी नेता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुशहाला हुसैन - Divya Marathi
मुशहाला हुसैन
श्रीनगर - पाकिस्तान आणि भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची (एनएसए) रविवारी बैठक होत आहे. त्याआधी काश्मीरमधील फुटिरतावादी संघटनांच्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. पाकिस्तानचे एनएसए सरताज अजीज यांनी बैठकीआधी फुटिरतावादी हुरियत नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चेचा कार्यक्रम आखला आहे. त्यावरून उभय देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
जेकेएलएफ चीफ यासीन मलिक यांना अटक करण्यात आली. त्यानंतर सैय्यद अली शाह गिलानी यांना सोडून बाकी सर्व नेत्यांना सोडून देण्यात आले. यासीन यांना देखील सोडण्यात आले. यासीन जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचे नेते आहेत. त्यांची पत्नी मुशहाला हुसैन प्रसिद्ध चित्रकार आहेत. त्यांच्या पेटिंग्जची ख्याती जगभरात आहे. यासीन आणि मुशहाला यांची पहिली भेट पाकिस्तानात झाली होती. एका फुटिरतावादी आंदोलनासाठी यासीन पाकिस्तानात गेले होते, तेव्हा त्यांचे भाषण ऐकण्यासाठी मुशहाला आल्या होत्या. यासीनच्या भाषणाने त्या अत्यंत प्रभावित झाल्या यासीनला भेटण्याची इच्छा त्यांनी आईजवळ व्यक्त केली. जेव्हा आईने त्यांची दोघांची भेट घडवून आणली तेव्हा यासीन यांनी मुशहाला यांना ऑटोग्राफ दिला होता. या भेटीनंतर दोघांची मनेजुळली आणि त्यांनी 2009 मध्ये पाकिस्तानात लग्न केले.
मुशहाला पाकिस्तानी
मुशहाला या मुळच्या पाकिस्तानातील आहेत, मात्र त्यांचे शिक्षण विदेशात झाले. लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्सच्या त्या पदवीधर आहेत. त्यांचे वडील एम.ए.हुसैन पाकिस्तानातील ख्यातकिर्त अर्थतज्ज्ञ आहेत. तर, त्यांची आई रेहाना पाकिस्तान मुस्लिम लीगच्या महिला विभागाच्या अध्यक्षा आहेत.
दिल्लीतील हॉटेलातून बाहेर काढले होते
यासीन आणि मुशहाला एकदा त्यांच्या मुलासह दिल्लीला आले होते. दिल्लीतील एका हॉटेलमध्ये ते मुक्कामी होते. मात्र जेव्हा हॉटेल मालकाला माहित पडले की यासीन काश्मीरमधील फुटिरतावादी नेता आहे तेव्हा त्यांनी त्याला कुटुंबासह तत्काळ बाहेर पडण्यास सांगितले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधित फोटोज...