(अलगाववादी नेता यासिन मालिक यांची पत्नी मुशहाला - फाइल फोटो)
श्रीनगर - नुकतेच माजी अलगाववादी नेता सज्जाद लोन आणि पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या भेटीमुळे काश्मीर घाटातील राजकारण चांगलेच तापले आहे. तज्ज्ञांच्या मते भाजपाकडून हे ठरवून राजकारण होत आहे, कारण काश्मीरमध्ये भाजपाला त्यांचे उमेदवार निवडणून आणायचे आहेत. यासाठी तेथील माजी अलगाववादी नेत्यांना
आपल्यासोबत जोडून घेण्यासाठी भाजपा प्रयत्न करत आहे. लोन आणि मोदी यांच्या भेटीमुळे अलगाववादी नेत्यांसमोर एक नवे आवाहन उभे आहे. काही वर्षांपूर्वीच काश्मीरबद्दल भारताच्या भूमिकेवर अलगाववादी नेते यासिन मलिक आणि त्यांची पत्नी मुशहाला यांनी गंभीर टीका केली होती. जम्मू कश्मीर लिबरेशन फ्रन्टचे नेते यासिन मलिक नेहमी कोणत्याना कोणत्या वादामुळे चर्चेत असतात. मग तो वाद 26/ 11 हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफीज सईदसोबतच्या लंचचा असेल अथवा काश्मीर अलगाववादचा. तर दुसरीकडे त्यांची पत्नी मुशहाला हुसेन त्यांच्या चित्रांसाठी प्रसिध्द आहे.
पाकिस्तानमध्ये झाली होती भेट
यासिन आणि मुशहाला यांची भेट पहिल्यांदा पाकिस्तानात झाली. एक अलगाववादी आंदोलनासाठी यासिन पाकिस्तानला गेले होते. तेव्हा तेथे मुशहालासुध्दा आल्या होत्या. येथे यासिन यांच्या भाषणाने मुशहाला चांगल्याच इम्प्रेस झाल्या होत्या आणि त्यांना भेटण्याची इच्छा त्यांनी आईला बोलून दाखवली. जेव्हा त्यांच्या आईने या दोघांची भेट घालून दिली तेव्हा मुशहालाने यासिनने ऑटोग्राफ दिला होता. या भेटीनंतर मुशहाला आणि यासिन यांची मने जुळली आणि दोघांनी 2009 ला पाकिस्तानमध्ये लग्न केले.
पुढील स्लाईडमध्ये वाचा, पाकिस्तानातील रहिवाशी आहे मुशहाला