आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगात कुत्र्यासारख्या हालचाली : सीताराम येचुरींचे वादग्रस्त वक्तव्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुवनेश्वर - योग व कुत्रे यांचा संबंध लावल्याने माकप सरचिटणीस सीताराम येचुरी वादात अडकले आहेत. योग दिन समारंभावर टीका करताना येचुरी म्हणाले, ‘कुत्रा जेव्हा उठतो तेव्हा तो आपले पुढचे व मागचे पाय ताणतो. दीर्घ श्वास घेतो. सर्व योगासनांमध्ये कुत्र्याच्या या हालचालींचे प्रतिबिंब पडलेले दिसते.’ येचुरी यांच्या या वक्तव्यावर ट्विटरवर टीका झाली.

माकपचे दिवंगत सरचिटणीस हरकिशनसिंग सुरजित यांच्या जयंती समारंभात येचुरी बोलत होते. ते म्हणाले, ‘योगामुळे मुख्य मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष हटवले जात आहे. योगापेक्षा भूकबळीच्या समस्येचे निराकरण गरजेचे आहे. केंद्रात रालोआच्या सरकारची वर्षपूर्ती झाली असताना जगातील सर्वांत जास्त १९.४६ कोटी लोक भारतात उपाशी आहेत.’

शालेय अभ्यासक्रमात योग
केंद्र सरकारच्या सर्व शाळांत इयत्ता सहावी ते दहावीपर्यंतच्या वर्गात योगशिक्षणाचेही धडे घ्यावे लागतील. त्यासाठी १०० पैकी ८० गुण प्रात्यक्षिकासाठी असतील. आसने करून दाखवल्यानंतरच हे गुण दिले जातील.
बातम्या आणखी आहेत...