आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येड्डींनी हरवले कर्नाटकात भाजपला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू/ नवी दिल्ली - कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला नामुष्कीचा पराभव पत्करावा लागला तर काँग्रेस 7 वर्षांनंतर पुन्हा सत्तेत आली. माजी मुख्यमंत्री येदियुरप्पांची बंडखोरी भाजपला भोवली, शिवाय दक्षिणेतील पहिल्या सरकारच्या कार्यकाळातील भ्रष्टाचारामुळे प्रतिमाही डागाळली. येदियुरप्पांनी केवळ 6 जागा जिंकल्या, परंतु 51 जागांवर भाजपच्या मतांना सुरुंग लावला. शिवाय, 20 जागांवर त्यांच्यामुळे भाजपला अप्रत्यक्ष फटका बसला. 224 जागांपैकी काँग्रेसला 121 जागा मिळाल्या आहेत. पंतप्रधानांनी याचे श्रेय राहुल गांधी यांना दिले तर नरेंद्र मोदी यांना लोकल नेते असल्याचे सांगत खिल्ली उडवली. कपिल सिब्बल यांनीही मोदींवर तोंडसुख घेत ते ‘झीरो’ असल्याचे सांगितले.

कर्नाटकात केवळ 40 जागा, 51 जागांवर येदियुरप्पांमुळे नुकसान
काँग्रेसला स्पष्ट बहुमत, 7 वर्षांनंतर राज्यात सरकार स्थापणार
विरोधी पक्षनेतेपदासाठी भाजप-जदमध्ये चुरस

निवडणूक निकाल
०एकूण जागा 224 ० मतदान 223 जागी
पक्ष जागा फटका
भाजप 40 -70
काँग्रेस 121 +41
जेडीएस 40 +12
केजेपी 07 +07
इतर 15 +10

भास्कार गाईड
निकालाचे असेही पैलू
भ्रष्टाचाराचे आरोप असूनही काँग्रेस जिंकलीच कशी?
कारण, कर्नाटकात स्थानिक मुद्देच महत्त्वाचे ठरले. जनता केंद्र सरकारपेक्षा भाजप सरकारच्या भ्रष्टाचाराने त्रस्त होती.


केवळ भ्रष्टाचारामुळेच भाजप हरला?
भ्रष्टाचार हा मुद्दा होताच, शिवाय घराणेशाही हे मोठे कारण ठरले. खाणमाफियांना प्रोत्साहन, तीन मुख्यमंत्री आणि येदियुरप्पांचे बंड ही प्रमुख कारणे होती.


मोदी फॅक्टर फेल झाला?
मोदींची जादू आजवर गुजरातेत चालली आहे. त्यांनी निवडणुकीत चित्रच पालटून टाकले, असे एकही दुसरे राज्य नाही. मोदींची ही पहिली परीक्षा होती. त्यात ते नापास झाले. मोदींना सर्वांत लोकप्रिय नेता म्हणणारे राजनाथही या परीक्षेत नापास झाले.


राहुल फॅक्टरचा विजय?
काँग्रेसला हे राहुलचे यश वाटते. पराभव झाला तर प्रत्येकाच्या जबाबदारीनुसार त्याचे माप त्याच्या पदरात दिले जाईल, हा इशारा परिणामकारक ठरला.
राहुल विरुद्ध मोदी
48% यश

राहुल यांनी 63 जागांवर प्रचार केला. 34 जागा काँग्रेसने जिंकल्या.
35 % यश


मोदींनी 37 मतदारसंघांत प्रचार केला.
यातील 13 जागा भाजपला मिळाल्या.


‘पप्पू पास, फेकू फेल’ सोशल मीडियावरील प्रतिक्रिया
येड्डी घेऊन बुडाले
० भाजप 59 जागांवर तर येदियुरप्पांचा केजेपी 36 जागांवर दुसºया स्थानी राहिला. म्हणजेच दोन्ही पक्ष मिळून 223 पैकी 95 जागांवर दुसºया स्थानी राहिले.
० 51 जागा तर अशा आहेत की येड्डींची मते भाजपला मिळाली असती तर डावच उलटला असता. हगरीबोम्मनहल्लीमध्ये भाजप उमेदवार केवळ 125 मतांनी हरला. येथे केजेपीला 6 हजार मते पडली.


आता पुढील आव्हान
भाजप आणि सहकारी पक्षांचे सध्या 7 राज्यांत सरकार आहे. लोकसभेच्या त्यांच्याकडे 122 जागा आहेत.
काँग्रेस आणि सहकारी पक्षांचे 14 राज्यांत सरकार. म्हणजेच लोकसभेच्या 188 जागांवर आघाडी.
या वर्षी 6 राज्यांत निवडणूक होत आहे. यात भाजप 2 तर काँग्रेस 4 राज्यांत सत्तेत आहे. या राज्यांत लोकसभेच्या एकूण 74 जागा आहेत.