आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावर नमाज थांबवू शकत नसेल तर जन्माष्टमीला बंदी कशी घालू- योगी आदित्यनाथ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - पोलिस स्टेशनमध्ये आयोजित जन्माष्टमी सोहळ्यांबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ईदच्या दिवशी मी रस्त्यांवर नमाज अदा करण्यावर बंदी घालू शकत नसेल तर पोलिस स्टेशनमधील जन्माष्टमी थांबवण्याचा मला काहीच अधिकार नाही, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
 
प्रसिद्ध कावड यात्रेचा संदर्भ देत योगी म्हणाले, ‘कावड यात्रेत ढोल-ताशा वाजणार नाही, लाऊडस्पीकर असणार नाहीत तर मग ती कावड यात्रा कसली? ही कावड यात्रा आहे, प्रेतयात्रा नव्हे त्यामुळे ढोल-ताशा तर वाजणारच.’ धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरवर बंदी घालण्याचे आदेश आपण अधिकाऱ्यांना दिले होते, पण हा नियम लागू करता येत नसेल तर कावड यात्रेतील लााऊडस्पीकरवरही बंद घालता येणार नाही, असेही योगी यांनी स्पष्ट केले.
 
या वक्तव्यावर समाजवादी पक्षाने टीका केली आहे. स्वत:ला यदुवंशी मानणाऱ्या समाजवादी पक्षाच्या लोकांनीसुद्धा पोलिस स्टेशनमध्ये जन्माष्टमीचे आयोजन करण्यास बंदी घातली होती. योगींनी त्यास प्रत्युत्तर देत म्हटले, समाजवादी सरकारने पोलिस स्टेशनमधील जन्माष्टमी आयोजनावर कधीच बंदी आणली नव्हती. आणली असेल तर त्यांनी आदेश दाखवावा. मुख्यमंत्री पदावर असताना अखिलेश यादव दरवर्षी पोलिस लाइन्समध्ये जन्माष्टमी सोहळ्यात भाग घेत असत.
बातम्या आणखी आहेत...