आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार आदित्यनाथ म्हणाले, राजनाथ यांनी बनावे युपीचे CM, मी दावेदार नव्हतोच!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आदित्यनाथ म्हणाले, मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नव्हतोच. (फाइल) - Divya Marathi
आदित्यनाथ म्हणाले, मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नव्हतोच. (फाइल)
गोरखपूर( गोरखनाथ मंदिरातून) - युपीमध्ये भाजपची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण बनणार याबाबत पार्टीचे फायरब्रँड नेते योगी आदित्यनाथ यांचे एक आश्चर्यकारक वक्तव्य समोर आले आहे. आमचे प्रतिनिधी रोहिताश्व कृष्ण मिश्रा यांना दिलेल्या मुलाखतीत आदित्यनाथ राजनाथ सिंहांचे नाव घेत म्हणाले, युपीमध्ये भाजपची सत्ता आल्यास राजनाथ सिंहांनी मुख्यमंत्री बनावे, त्यांचे स्वागत असेल. त्यांना माझ्या शुभेच्छा. एवढेच नाही तर मी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार नव्हतोच असेही योगी आदित्यनाथ म्हणाले. 

याच मुलाखतीत योगी आदित्यनाथ यांनी कारगिल युद्धातील शहीदाची कन्या गुरमेहर कौरशी संबंधित प्रकरणावरही आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यांनी हा वाद योग्य असल्याचे सांगत, भविष्यात जशास तसे उत्तर देणार असल्याचे म्हटले आहे. 

मुलाखतीत काय म्हणाले, योगी आदित्यनाथ.. 
Q. राजनाथ सिंहांबाबत असे म्हटले जाते की, युपीमध्ये सत्ता आली तर सीएम बनतील आणि हारले तर केंद्रात पीएम बनतील. याबाबत तुमचे म्हणणे काय?
A. राजनाथ सिंह आमचे ज्येष्ठ नेते आहेत. जर युपीमध्ये भाजपची सत्ता आली तर राजनाथ यांनीच मुख्यमंत्री बनावे. त्यांचे स्वागत आहे. आमच्या शुभेच्छा आहेत. 

Q. मग 5 वेळा खासदार बनलेल्या योगींचे काय होईल?
A. मी मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत होतोच कधी. समर्थक तसे म्हणत असतील. पण त्यांच्या म्हणण्याने काय होते. अंतिम निर्णय पक्षाचा असतो. 

Q. पण काही दिवसांपूर्वी तुमच्याकडून असे वक्तव्य आले होते की, मुख्यमंत्री बनण्यासाठीचे तिनही गुण तुमच्यामध्ये आहेत. तुमचे समर्थकही तशी मोहीम राबवत आहेत. हा पक्षावर दबाव आणण्याचा प्रकार तर नाही. 
A. नाही, तसे काहीही नाही. 

Q. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत प्रत्येक पतक्षाकडे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आहे. पण भाजप मुख्यमंत्री पदाचा उमेदवार न देता लझत आहे. पक्षात अशा पात्र नेत्यांची कमतरता आहे का ?
A. नाही. तुम्ही असे कसे म्हणू शकता की आमच्याकडे तसे उमेदवार नाही म्हणून. आमच्या पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा मुख्यमंत्री बनू शकतो. आम्ही राहुल गांधी किंवा काँग्रेस नाही. 

Q. कारगिल युद्धाच्या शहीदाची कन्या गुरमेहर कौर प्रकरणात दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या गोंधळाबाबत काय म्हणणे आहे. 
A. गोंधळ तर होणारच अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे राष्ट्रीय एकता आणि अखंडता यापेत्रा मोठे असू शकत नाही. राष्ट्रीय एकतेचा खेळखंडोबा कधीही सहन केला जाणार नाही. देशातील प्रत्येक तरुण त्याचे संरक्षण करेल. राष्ट्रीय एकतेवर कोणीही बोट ठेवले तर ते सहन केले जाणार नाही. त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...