हाजीपूर (बिहार) - येथे आयोजित 'संत समागम' कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी 'माला के साथ भाला' (प्रार्थनेसोबत युद्ध) हा मंत्र देत 'घर वापसी' कार्यक्रमात केंद्र सरकारने दखल देऊ नये असे, सांगितले आहे. त्यासोबतच बाबरी मशिद पाडून हिंदूंनी एकतेचे दर्शन घडविले होते. यापुढे 15 लाख संत 6.23 लाख गावांत गेले तर, मुठभर ख्रिश्चन धर्मगुरु आणि मौलवी हिंदूंचे धर्मांतर करु शकणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
योगी आदित्यनाथ यांनी मठाधिपती आणि मंदिरांच्या अध्यक्षांना आवाहन केल, की त्यांनी गावागावत जाऊन हिंदूंची एकजूट करावी. त्यांनी उपस्थितांना सवाल केला, नालंदा विद्यापीठ नष्ट केले गेले तेव्हा आम्ही ते गांभीर्याने घेतले नाही, असे का? नालंदा कोणी नष्ट केले, याचा आम्ही शोध का घेतला नाही? योगी आदित्यनाथ म्हणाले, संतांची समाजाशी असलेले संबंध - भेटी कमी झाल्या आहेत. त्यांनी विरोधीपक्षावरही आरोप केला. ते म्हणाले, हिंदूंचे जेव्हा धर्मांतर होते, तेव्हा विरोधक शांत बसतात, मात्र 'घर वापसी'विरोधात त्यांचा आवाज चढलेला असतो.
हिंदू आणि संतांनी आता युद्धासाठी सज्ज राहावे, असे सांगत योगी म्हणाले, 'कृष्णाने दुष्टांना दंड करण्यास सांगितले. मग ते तुमचे सगे-सोयरे असले तरीही.' महात्मा गांधींच्या नावाचा उल्लेख न करता योगी म्हणाले, 'मात्र भारतायींनी यशूची शिकवण अंगीकारील. जर कोणी एका गालावर चापट मारली तर, दुसराही गाल पुढे करा.' आदित्यनाथ शस्त्र धारण करण्याचा सल्ला देत म्हणाले, 'आता द्रोणाचार्य बनण्याची वेळ आली आहे. अर्थात हातात शस्त्र घेतले पाहिजे.'
केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर बिहारमध्ये संत समागम हा कार्यक्रम प्रथमच झाला. पुढील वर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणुका आहेत.हा कार्यक्रम तीन दिवस चालणार असून केंद्रीय मंत्री रामकृपाल यादव आणि लोक जनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान देखील यासाठी उपस्थित राहाणार आहेत. योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी उपस्थितांना बळजबरीने होणार्या धर्मांतरला विरोध करण्याची आणि हिंदूच्या घर वापसीचे स्वागत करण्याची शपथ दिली.
पुढील स्लाइडमध्ये, शिवसेनेने केली राममंदिर उभारणीची मागणी