आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्यांदाज ताजमहालला भेट देणार CM योगी आदित्यनाथ, अर्धा तास तेथेच थांबणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
26 ऑक्टोबर रोजी ते ताजमहालात जाणार आहेत. - Divya Marathi
26 ऑक्टोबर रोजी ते ताजमहालात जाणार आहेत.
लखनौ - जगातील प्रमुख आश्चर्यांपैकी एक ताजमहालावर राजकारण सुरू असतानाच यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या ऐतिहासिक वारसाला भेट देणार आहेत. 26 ऑक्टोबर रोजी होणारा हा दौरा सीएम योगींचा हा पहिलाच ताजमहाल दौरा मानला जात आहे. यावेळी अर्धा तास तेथेच थांबत ते शहाजहा आणि मुमताज यांच्या कब्रींचे दर्शन घेणार आहेत.
 
 
उल्लेखनीय बाब म्हणजे, भाजप आमदार संगीत सोम यांनी ताजमहालावर वादग्रस्त विधान केले होते. तसेच स्वतः योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या पर्यटन पुस्तिकेत ताजमहलाचा समावेश केला नव्हता. वाद झाल्यानंतर त्यांनी राज्याच्या पर्यटन कॅलेन्डरवर स्वतः आणि मोदींच्या छायाचित्रासह ताजमहलाचेही छायाचित्र प्रकाशित केले. 
 
 
आग्रा किल्ला, फतेहपूर सिकरीला देखील जाणार योगी...
>> सीएम झाल्यानंतर ते प्रथमच आग्रा शहरात जात आहेत. ताज महालसोबतच ते फतेहपूर सिकरी, आग्रा किल्ला आणि इतर स्मारकांना देखील भेट देतील. या दरम्यान ते यमुना तट आणि तेथे प्रस्तावित कॉरिडोरचा आढावा घेणार आहेत. 
>> ताज महालावर भाजप नेत्यांच्या टीकांनंतर राजकीय वादंग सुरू असताना योगींचा हा दौरा सारवासारव मानला जात आहे. ताजमहालाचा वाद मिटवण्यासाठीच त्यांनी हा दौरा करण्याचा निर्णय घेतला असे सांगितले जात आहे. 
>> यापूर्वी भाजप आमदार संगीत सोम यांनी ताजमहाल हे देशद्रोह्यांनी बांधल्याचे विधान केले होते. तसेच आणखी एक भाजप आमदार अनिल विज यांनी ताजमहालाची प्रतिकृती सुद्धा घरात ठेवणे अपशकुण असल्याचे म्हटले होते.
बातम्या आणखी आहेत...