आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज, शेतकरी कर्जमाफीसह आठ योजनांवर असणार नजर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या तीन महिन्यात योगी सरकारने एकही नवी योजना सुरु केलेली नाही. - Divya Marathi
गेल्या तीन महिन्यात योगी सरकारने एकही नवी योजना सुरु केलेली नाही.
लखनऊ - मार्चमध्ये उत्तर प्रदेशात सत्तेवर आलेल्या योगी सरकारला मंगळवारी तीन महिने 22 दिवस होत असून आज ते 8 महिन्यांसाठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. अर्थमंत्री राजेश अग्रवाल दुपारी 12.20 वाजता अर्थसंकल्प सादर करतील. जवळपास 4 लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असेल. यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसोबत इतर 8 मोठ्या योजनांची घोषणा होण्याची शक्यता आहे. याआधी अखिलेश सरकारने 2016-17 साठी 3 लाख 46 हजार 935 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. योगी सरकार गेल्या तीन महिन्यांपासून अंतरिम बजेटवर सरकार चालवत होते. वास्तविक या तीन महिन्यात कोणतीही नवी योजना त्यांनी सुरु केलेली नाही. 
 
या आठ योजनांवर सर्वांची नजर 
#1 - शेतकरी कर्ज माफी 
#2 - नव्या नावासह लॅपटॉप योजना 
#3 - अन्नपूर्णा भोजनालय योजना (5 रुपयांत नाश्ता आणि 10 रुपयांत गरीबांना जेवण)
#4 - विवाह अनुदान योजना सरकार नव्या नावाने घोषित करेल 
#5 - 10वी पास मुलींसाठी पुरस्कार योजना 
#6 - ऊस आणि बटाटे उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवी योजना, जिल्ह्यात कृषि उत्पादन सेंटर 
#7 - रस्ते विकासाची नवी योजना 
#8 - लखनऊ मेट्रो सोबत गोरखपूर आणि वाराणसी मेट्रो 
 
योगी सरकारचा पहिला अर्थसंकल्प 
- अर्थमंत्री राजेश अग्रवाल हे योगी सरकारचा पहिला अर्थसंकल्प मंगळवारी सादर करणार आहे. याआधीच्या सरकारमध्ये माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी 5 वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. अर्थमंत्रालय हे अखिलेश यांच्याकडेच होते. यंदा यावेळी अर्थमंत्रालय मुख्यमंत्र्यांकडे नाही त्यामुळे अर्थमंत्री राजेश अग्रवाल हे अर्थसंकल्प सादर करतील. 
- मायावती सरकारमध्येही अर्थ खाते हे स्वतंत्र होते. 
 
शेतकऱ्यांवर फोकस 
- अर्थमंत्री राजेश अग्रवाल म्हणाले, 'शेतकरी आर्थिकदृष्ट्या जेवढे सक्षम असतील तेवढाच मजबुतीने राज्याचा विकास होईल. शेतकरी हेच राज्याला पुढे घेऊन जाणार आहेत. शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या उपकरणांवर सुट दिली जाणार आहे. शेतकरी स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभा राहिला पाहिजे हीच सरकारची भूमिका आहे.'
- अधिकार म्हणाले, की भारतीय जनता पक्ष (भाजप) हे वर्ष दीनद्याल शताब्दी वर्ष म्हणून साजरे करत आहे. त्यामुळे शक्यता आहे की जास्तीत जास्त योजनांना त्यांचे नाव दिले जाऊ शकते. त्यासोबतच श्यामा प्रसाद मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी यांचेही नाव दिले जाईल. 
- शेतकरी कर्जमाफीसाठी 36 हजार कोटींची तरतूत केली जाण्याची शक्यताही अधिकाऱ्यांनी वर्तवली. 
बातम्या आणखी आहेत...