आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू सोडवण्यासाठी योगी सरकारने बनवला प्लॅन, बटाटे-बिटापासून करणार मद्यनिर्मिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - योगी सरकार बटाटे आणि बीटरूटपासून दारू बनवणार आहे. अबकारी विभागाचे अंडर सेक्रेटरी विनोद तिवारी यांनी सांगितले की, बटाटे आणि बीट यापासून दारू बनवण्याची योजना बनवण्यात आली आहे. यामुळे लोकांच्या तब्येतीवर वाईट परिणाम होणार नाही. सोबतच बहुतांश मद्यपींची दारूची सवयही सुटेल, असे विभागाचे म्हणणे आहे.
 
भारतात पहिल्यांदा बनवणार बटाटे - बीटरूटपासून दारू
- अंडर सेक्रेटरी तिवारी म्हणाले की, बहुतांश दारू ऊस, गहू, ज्वारी, मका, अंगूर, मोहाची फुले इत्यादीपासून बनवली जाते. परंतु आता बटाटे आणि बीटरूटपासून ती बनवली जाईल. याचा
भारतात पहिल्यांदा आम्ही प्रयोग करत आहोत.
- या प्रोसेसमधून बनवणाऱ्या दारूसाठी जवळजवळ 35 ते 40 रुपये प्रतिलिटर खर्च येईल. सध्या उसासाठी जो खर्च येतोय तो 42 रुपये प्रतिलिटर इतका आहे. यानंतर फ्लेव्हर, कव्हर, पॅकिंग, मार्केटिंग, डिस्ट्रिब्यूशन आणि टॅक्स मिळून त्याचे रेट वाढतात.
 
कशी बनवणार बटाटे आणि बिटापासून दारू?
- बटाटे आणि बिटात आढळणारे स्टार्च डिसेन्टिग्रेस प्रक्रियेतून ग्लुकोजमध्ये बदलतात. यातून अतिज्वलनशील अल्कोहोल मिळते.
- यात पाणी मिसळून डायलूट केले जाते आणि मग 'पिण्यायोग्य' दारू मिळते.
- 1 लिटर दारूमध्ये 42 टक्के अल्कोहोल आणि उर्वरित पाणी व फ्लेव्हर ठेवले जाते. यानंतर 'पिण्यायोग्य' चांगल्या गुणवत्तेची दारू मिळते. या स्टँडर्डशिवाय बनणारी दारू जीवघेणी ठरते.
 
मद्यनिर्मितीसाठी 1 लाख मेट्रिक टन बटाटे खरेदी करणार
- योगी सरकारने 487 रु. क्विंटल दराने एक लाख मे. टन बटाटे खरेदी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ही खरेदी नाफेडकडून केली जाणार आहे.
- उत्तर प्रदेशात 1708 शीतगृहे आहेत. यात 130 लाख मेट्रिक टन स्टोअरेज क्षमता आहे. सध्या 95 लाख मेट्रिक टन साठा झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...