आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Young Couple Dead Bodies Found Hanging On Tree At Charliganj Rajsthan

राजस्थानात प्रेमी युगुलाची आत्महत्या, झाडाला लटकलेले आढळले मृतदेह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: आक्रोश करताना सुरेंद्रचे नातेवाईक)

भरतपूर- राजस्थानातील भरतपूर शहरातील चिकसाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चार्लीगंजमध्ये एक प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोघांचे मृतदेह गावाबाहेरील एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले.

तरुणीच्या नातेवाईकांच दोघांची हत्या करून त्यांना झाडाला लटकावून दिल्याचा आरोप तरुणाच्या नातेवाईकांनी केले आहेत. पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करून पोस्टमार्टम झाल्यानंतर दोघांचे पार्थिव त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चार्लीगंज येथील 21 वर्षीय सुरेंद्र करतार सिंह आणि 17 वर्षीय भुरी उर्फ सुशीला अशोक कुमार यांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघांचे मृतदेह गावाबाहेरील एका झाडाला लटकलेले आढळून आले. घटनास्थळी एक सीरिंज आणि इंजेक्शनची बाटलीही आढळून आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सुरेंद्र सकाळी उठून व्यायाम करायचा. मात्र, रविवारी सकाळी गावातील एक व्यक्ती त्याला मोटर सायकलवर बसवून सोबत घेऊन गेला होता. त्यानंतर सुरेंद्र आणि भुरीचे मृतदेह आढळून आल्याचे सुरेंद्रच्या नातेवाईकांनी म्हटले आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, सुरेंद्रच्या नातेवाईकांनी कोणावर लावले आरोप...