आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैदानावर झेल घेताना धडक, २० वर्षीय खेळाडू अंकितचा झाला मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा अपघात. मागील वर्षी ऑस्ट्रेलियाचा फिलिप ह्यूज आणि आता केवळ २० वर्षांच्या अंकित केशरीचा मृत्यू. शुक्रवारी ज्या सामन्यात ही दुर्घटना झाली अंंकित त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही नव्हता.अर्णव नंदीच्या जागी तो मैदानावर उतरला होता. दरम्यान, अंकितचा उपचार वादात सापडला अाहे. एमरी रुग्णालयाने अंकितला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यास सांगितले होते.त्यामुळे आपण त्याला दुस-या रुग्णालयात नेल्याचे संघ प्रशिक्षक प्रणव नंदी यांनी म्हटले आहे. नंदींनी ऐकले नाही, त्याआधीच ते अंकितला घेऊन गेले, असे रुग्णालयाचे म्हणणे आहे.
ते षटक ठरले जीवनातील अखेरचे
शुक्रवारी ईस्ट बंगाल आणि भवानीपूरदरम्यान सामना चालू होता. १२ वा खेळाडू म्हणून अंकित बाहेर बसून सामना पाहत होता. सामन्याच्या दुस-या शेवटच्या षटकात अर्णव नंदी जखमी झाल्यामुळे अंकित क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला. कर्णधाराने त्याला स्वीप कव्हरसाठी उभे केले. डावखुरा वेगवान गोलंदाज सौरव मंडलच्या चेंडूवर फलंदाजाने लांब शॉट मारला आणि चेंडू हवेत उंच उडाला. कव्हरला उभा असलेला अंकित कॅच घेण्यासाठी धावला. तिकडे वेगवान गोलंदाज सौरवही फॉलो थ्रूमध्ये कॅच घेण्यासाठी धावला. याचदरम्यान दोघांत जोराची धडक झाली आणि अंकितच्या तोंडातून रक्त येऊ लागले. तो तेथेच कोसळला आणि बेशुद्ध पडला. फलंदाजी करत असलेला बंगालचा माजी स्पिनर शिवसागर सिंह आणि फलंदाज अनुप मुजुमदार त्याच्या जवळ धावत आले. शिवसागरने तत्काळ तोंडाने कृत्रिम श्वासाेच्छ‌््वास दिला. अंकितने श्वास घेणे सुरू केले. त्यानंतर त्याला जवळच्याच एमरी रुग्णालयात नेण्यात आले. रविवारी सायंकाळी अंकितने तो बरा होत असल्याचे संकेत दिले होते. त्याला जेवणही देण्यात आले होते. मात्र रात्री उशिरा प्रकृती बिघडली. सोमवारी पहाटे त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याची प्राणज्योत मालवली.
मैदानावर झालेल्या दुर्घटनेत एका उगवत्या खेळाडूचा अंत झाला, अशा शब्दांत सचिन तेंडुलकरने या घटनेनंतर शोक व्यक्त केला.