आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेत येता-जाता खेचायचा ओढणी, त्रस्त होऊन 11वीच्या मुलीने उचलले हे पाऊल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहाजहांपूर (यूपी) - येथे 11वीच्या एका विद्यार्थिनीने शनिवारी घरात फाशी घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, मागच्या अनेक दिवसांपासून शाळेत येता-जाता एक तरुण त्रास देत होता. तक्रार करूनही त्याने त्रास देणे थांबवले नव्हते. पोलिसांत तक्रार देऊनही काहीच कारवाई झाली नाही, यामुळे त्रस्त होऊन मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
 
आधी सायकल थांबवली मग ओढणी खेचली
- ही घटना शहाजहांपूरच्या तिलहर परिसरातील आहे. येथे राहणारी 11वीची विद्यार्थिनी आरती (बदललेले नाव) घरातून 3 किमी दूर शाळेत शिकायला जात होती.
- तिचा आरोप आहे की, मागच्या अनेक दिवसांपासून शेजारच्या गावातील तरुण नवीन वाटेत तिची छेड काढायचा आणि अश्लील हरकती करायचा. त्याने नातेवाइकांना तक्रार दिली, परंतु यानंतरही तो छेड काढतच राहिला.
- 12 ऑक्टोबरला परिसरातील मार्केटजवळ तरुणाने मुलीची सायकल रोखली आणि तिची ओढणी धरली.
- मृत मुलीच्या भावाचे म्हणणे आहे की, बहिणीने डायल 100 वर तक्रार दिली होती. पोलिसांनी आरोपीला तेथून पकडून पोलिसांत नेले.
- परंतु कोणतीही कारवाई न करता त्याला समजावून सोडले. यानंतर आरोपीचा बाप घरी आला आणि त्याने आम्हालाच धमकी दिली. यामुळे तणावात येऊन माझ्या बहिणीने गळफास लावून आत्महत्या केली.
 
काय म्हणतात पोलिस?
- सीओ मनोजकुमार काय म्हणतात, विद्यार्थिनीने फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. परंतु छेडछाडसारखी घटना समोर आलेली नाही. तपास सुरू आहे. मृत मुलीच्या कुटुंबीयांनी जर छेडछाडीची तक्रार दिली तर गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...