आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिमद्यपानाने तरुणीचा मृत्यू, मित्रांसोबत रात्रभर कारमध्ये फिरत होती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर (मध्य प्रदेश)- महेशनगरातील निवृत्त वनअधिकारी नरेंद्र अवस्थी यांची मुलगी सुषमा हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मित्रांसोबत डिनरला जायचे आहे असे सांगून रात्रीच्या वेळी सुषमा घरुन निघाली होती. पण रात्रभर ती घरी परत आली नाही. सकाळी तिचे मित्र तिचा मृतदेह घेऊन पोलिस ठाण्यात गेले. अतिमद्यपानामुळे तिचा मृत्यू झाल्याचा दावा या मित्रांनी केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
जॉब मिळाल्याच्या आनंदात रात्रभर घेतली दारु
- सुषमाला चांगली नोकरी लागली होती. त्यामुळे तिने दोन मित्रांना रात्री पार्टी करण्यासाठी बोलवले होते.
- तिचे मित्र मनोज वाधवानी आणि जयकिशन कुरील पार्टीसाठी आले होते.
- मनोज कन्फेक्शनरीचा तर जयकिशन फॅब्रिकेशनचा व्यवसाय करतो.
- तिनेच दोघांना पार्टीसाठी बोलवले होते. त्यामुळे मनोज कार घेऊन आला होता.
- तिघांनी गोपूर चौकातून तिखट फरसाण आणि कॅंट चौकातून दारु विकत घेतली होती.
- त्यानंतर तिघांनी धावत्या कारमध्ये दारु घेण्यास सुरवात केली. राजेंद्रनगर येथील हॉटेलमधून खाद्यपदार्थ पॅक करुन घेतले.
- येथील तलावाजवळ पुन्हा त्यांनी यथेच्छ मद्यपान केले. या दरम्यान सुषमाची प्रकृती खालवली. ती कारमध्येच झोपली.
- मनोज आणि जयकिशन यांनी एका ढाब्यावर जेवण केले. सुषमा जेवली नाही. त्यानंतर तिघे सुर्यदेवनगरमधील ग्राऊंडवर कार उभी करुन त्यातच झोपले.
- सकाळी त्यांनी सुषमाला उठवण्याचा प्रयत्न केला. पण ती उठली नाही. तिचा मृत्यू झाला होता.
- त्यांनी मित्रांना फोन करुन घटना सांगितली. त्यांनी लगेच पोलिस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला.
गळा दाबून हत्या झाल्याचे उघडकीस
- पोलिसांनी सुषमाच्या मृतदेहावर शॉर्ट पीएम केला. त्यात तिचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे उघडकीस आले आहे.
- पोलिसांनी मनोज आणि जयकिशन यांना अटक केली आहे.
- सुषमा अशीच रात्रीच्या वेळी मित्रांसोबत फिरायला जायची. त्यानंतर सकाळीच घरी परतायची.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेशी संबंधित आणखी फोटो....
बातम्या आणखी आहेत...