आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मागच्या खोलीत विवस्त्र आढळली तरुणी, समोर होते आई-वडील-भावाचे रक्तबंबाळ मृतदेह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमिनीवर होता वडिलांचा मृतदेह. इन्सेटमध्ये रुग्णालयात दाखल बेशुद्ध मुलगी. - Divya Marathi
जमिनीवर होता वडिलांचा मृतदेह. इन्सेटमध्ये रुग्णालयात दाखल बेशुद्ध मुलगी.

भागलपूर - येथे एकाच कुटुंबातील तीन कुटुंबीयांचा निर्घृण खून करण्यात आला. पती-पत्नीचा जागेवरच मृत्यू झाला होता, तर त्यांच्या 12 वर्षांच्या मुलाचा जखमी अवस्थेत रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. 17 वर्षांची मुलगी गंभीर जखमी आहे, तिला पीएमसीएच पाटणामध्ये रेफर करण्यात आले आहे.

 

वडील-मुलाचे डोळे बाहेर काढले...
- गुन्हेगारांनी वडील-मुलाचे डोळेही काढून घेतले तर मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापून घेतला. घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. याची माहिती रविवारी सकाळी शेजारची महिला घरी कामानिमित्त आल्यावर मिळाली. दोन मृतदेह पडलेले आणि सगळीकडे रक्त सांडलेले पाहून तिने आरडाओरड सुरू केली. यानंतर गावकरी जमा झाले. मृत महिलेचे कपडे अस्ताव्यस्त होते, तरुणी नग्नावस्थेत होती. यामुळेच तिच्यावर रेप झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पती आणि पत्नीवर धारदार हत्याराने वार करण्यात आले. घटनेची एकमेव जिवंत साक्षीदार मुलगी बेशुद्ध आहे. पोलिस ती शुद्धीत येण्याची वाट पाहत आहेत. असे म्हटले जात आहे की, मुलीने बलात्काराला विरोध केल्याने नराधमांनी तिघांचा एवढा निर्घृण खून केला.

 

घरात असे पडले होते मृतदेह...
- रविवारी सकाळी मृत मुलीच्या घरी गेलेल्या शेजारी महिलेने सांगितले की, घराच्या मागच्या खोलीत जमिनीवर पत्नी रक्तबंबाळ होती, व्हरंड्यात मुलगा पडलेला होता. मागच्या खोलीत बेशुद्धावस्थेत मुलगी पडलेली होती. तिच्या शरीरावर एकही कापड नव्हते. मुलीच्या डोक्यातून ठिपकत असलेल्या रक्तामुळे तिचे पूर्ण शरीर लाल रंगाने माखले होते. तर तिच्या वडिलांचा रक्ताने माखलेला मृतदेह अंगणात पडलेला होता. त्यांच्या डोक्यावर गंभीर वार करण्यात आले होते. त्यांचा डोळा फोडलेला होता, एक कानही कापलेला होता. पूर्ण घरभर अनेक जणांची पावले उमटलेली होती.

 

20 दिवसांपासून शाळेत जात नव्हती मुलगी...
- जखमी व बेशुद्ध मुलगी आठवीची विद्यार्थिनी आहे. तिच्या दोन मोठ्या बहिणी, व दोन मोठे भाऊही आहेत. गावकरी म्हणाले, मुलगी मागच्या 20 दिवसांपासून शाळेत गेली नव्हती. पण ती का जात नव्हती याचे उत्तर कुणाकडेच नाही. 


काय म्हणतात पोलिस?
- भागलपूरचे आयजी सुशील खोपडे म्हणाले, एकमेव जिवंत साक्षीदार मुलगी गंभीर जखमी असल्याने तिला पाटणाच्या रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. ती शुद्धीवर येण्याची प्रतीक्षा आहे. यामुळे घटनेच्या कारणांची माहिती मिळू शकेल. सध्या अधिक चौकशी सुरू असून लवकरच गुन्हेगारांना ताब्यात घेतले जाईल.

 

मुलीवर होती वाईट नजर, खुनामागे काही गावकरीही संशयाच्या भोवऱ्यात
- खुनामध्ये आसपासच्या लोकांचाच हात असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कुटुंबातील 17 वर्षीय मुलीवर वाईट नजर ठेवणाऱ्यांनीच ही घटना केली असेल. पोलिसही याच अँगलने तपास करत आहेत. तीन जणांना धारदार हत्यारांनी वार करून खून करणे आणि मुलीचा डोळा फोडणे तिला न्यूड करणे अशा गुन्ह्यांना तासभर वेळ लागला असेल, यादरम्यान मोठा आरडाओरडा झालाच असणार. परंतु हे कुणालाच कसे कळले नाही? ही बाब संशय उत्पन्न करते. 

 

चार महिन्यांनी होते मुलीचे लग्न
- मृताच्या नातेवाइकाने सांगितले की, जखमी 17 वर्षांच्या मुलीचे चार महिन्यांनी लग्न होणार होते. यासाठी तिचे वडील मजुरीकाम करून पैसे गोळा करत होते. आईही मजुरीसाठी जायची.


पोलिसांच्या मते कशा झाल्या असतील हत्या...
> पती : डोक्यात धारदार हत्याराने वार, दोन्ही डोळे फोडले, उजव्या कानशिलावर वार. पळू लागल्याने उजवा पाय तोडला. 
> पत्नी : डोक्याच्या मागे गंभीर जखम, उजवीकडे अर्धे डोके कापलेले.
> 12 वर्षीय मुलगा : दोन्ही डोळे फोडलेले. फरशीवर आपटून जीव घेतला.
> 17 वर्षीय मुलगी : डोक्याच्या मागे गंभीर जखम, विवस्त्र आणि बेशुद्धावस्थेत.

 

नोट: काही फोटोज बीभत्स आहेत.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या हृदयद्रावक घटनेचे आणखी फोटोज...

 

नोट: काही फोटोज बीभत्स आहेत.
बातम्या आणखी आहेत...