आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलींच्या धाकाने शिक्षकच येईना, गावातीलच तरुणी शिकवताहेत विद्यार्थ्यांना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जशपूर- छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यापासून २० किमी अंतरावरील झारखंड सीमेवर नक्षलग्रस्त भागात बरपानी हे गाव वसलेले आहे. सरकारने येथे प्राथमिक शाळा उघडल्यावर शिक्षणाने मुलांचे भविष्य सावरेल; मुलांना इंग्रजी शिकवण्याचे स्वप्न पूर्ण होईल, या विचाराने ग्रामस्थ अानंदून गेले. मात्र काही दिवसांनी नक्षलींच्या भीतीने शिक्षक शाळेत येण्यास घाबरू लागले. मुलांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होऊ लागला.

शहरांतील मुलांच्या तुलनेत आपली मुले मागे पडतील, इंग्रजीच त्यांचा कच्चा दुवा बनेल, ही चिंता पालकांना सतावू लागली. यामुळे त्यांनी एकत्र येऊन स्वत:च शाळा उघडली. साधीसुधी नव्हे इंग्लिश मीडियम स्कूल. अापल्या जमिनी दान केल्या. नक्षलींच्या भीतीमुळे शिकवण्यासाठी कुणीच समोर येईल. यामुळे गावातील दोन तरुणींनी या कामी पुढाकार घेतला. मुलांना आम्ही शिकवणार, असा निर्धार त्यांनी केला. ग्रामस्थांनी त्यांना प्रत्येकी चार-चार हजार पगार दिला. तो लोकवर्गणीतून दिला जातो. शिक्षिका सुषमा (२५) आणि नीलमने (२६) शहरात नातेवाइकांच्या घरी राहून शिक्षण पूर्ण केले आहे. शाळेत शिक्षणाचा दर्जा उणा राहू नये म्हणून ग्रामस्थांनी शाळेची देखभाल व मॉनिटरिंगची जबाबदारी आपल्याकडेच ठेवली आहे. तीन वर्षांपासून शाळा अखंडपणे सुरू आहे. गावात शाळा उघडण्यासाठी सर्वात मोठा प्रश्न होता जागेचा. गावातील एकाने मुलांच्या भविष्याकडे पाहत २२०० चौरस फूट जमीन दान दिली. यानंतर शेतकऱ्यांनी एकेक साधने गोळा करत शाळा उभारली. त्यात दोन खोल्यांसह शौचालय व क्रीडांगणाची व्यवस्था करण्यात आली आहे. शाळेची गुणवत्ता पाहून पंचक्रोशीतील इतर गावांतील अनेक लोक मुलांना शिक्षणासाठी तेथे पाठवत आहेत. सध्या तिसरीपर्यंतच्या या शाळेत २७ मुले शिकत आहेत. जवळपासच्या मुलांना सुविधा होईल, या उद्देशाने बरपानी गाव एक छोटेसे चारचाकी वाहन खरेदी करण्याचा िवचार करत आहे. यासाठी आतापर्यंत २८ हजारांची वर्गणी गोळा केली आहे.
बातम्या आणखी आहेत...