आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिस्ड कॉलने सुरु झाली विवाहितेची दोस्ती, परिणाम बघून अंगावर उभा राहिल काटा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जितेंद्र यांच्या पत्नीचा फोटो. - Divya Marathi
जितेंद्र यांच्या पत्नीचा फोटो.
लखनौ (उत्तर प्रदेश)- मोबाईल फोनवर आलेल्या एका मिस्ड कॉलने विवाहितेच्या आयुष्यालाच कलाटणी मिळाली. या महिलेच्या मोबाईलवर एका अननोन नंबरहून मिस कॉल आला होता. मिस कॉल देणारा एक तरुण होता. त्यानंतर दोघांमध्ये बोलणे सुरु झाले. त्याचे रुपांतर मैत्रित आणि नंतर प्रेमात झाले. या तरुणाला तिच्याशी लग्न करायचे होते. पण ती तयार नव्हती. अखेर संतप्त प्रेमीने असे पाऊल उचलले की कुणी त्याची कल्पनाही केली नव्हती.
 
वाचा कसा झाला मर्डर
- 5 डिसेंबर 2016 च्या रात्री जितेंद्र यादवची भाड्याच्या घरात गळा चिरुन आणि डोक्यावर विटेने प्रहार करुन हत्या झाली होती.
- जितेंद्रचा मित्र जमिल याने पोलिसांना याची माहिती दिली होती. चावी देण्यासाठी तो जितेंद्रच्या घरी गेला होता. तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले होते.
- आता तब्बल एका महिन्याने या प्रकरणाचा गुंता सोडविण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
 
विवाहितेशी लग्न करायचे होते
- पोलिस अधिकारी उदयवीर यांनी सांगितले, की जितेंद्रच्या सासऱ्यांना एकमेव मुलगी होती. तिच्याशी जितेंद्रने लग्न केले होते.
- सुमारे दोन वर्षांपूर्वी तिच्या मोबाईलवर एक मिस्ड कॉल आला. सद्दाम नावाच्या तरुणाने हा मिस्ड कॉल दिला होता.
- त्यानंतर दोघांमध्ये मैत्री आणि प्रेम झाले. दोघांमध्ये संबंध प्रस्थापित झाले.
- तिच्या नावावर सासरी एक जमिनीचा तुकडा होता. तिच्याशी लग्न करुन ती जमिन आपल्या नावावर करण्याचा कट सद्दामने रचला होता. पण तिने लग्नाला नकार दिला होता.
- नकार मिळाल्याने सद्दाम संतप्त झाला. त्याने हत्येचा कट रचला.
 
अशी केली हत्या
- सद्दामने जितेंद्रच्या घरी प्रवेश केला. त्याची गळा चिरुन हत्या केली. त्यापूर्वी त्याच्या डोक्यात वीट घातली होती.
- हत्या केल्यावर चाकू जमिनीत लपवून ठेवला होता. पोलिसांनी चाकू ताब्यात घेतला आहे.
- सद्दामला मदत करणाऱ्या आणखी एका आरोपीचा पोलिस तपास करत आहेत.
 
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेशी संबंधित फोटो...
बातम्या आणखी आहेत...