आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

1000 साप याला काही करु शकले नाही, ब्लॅक कोब्राने संपवला आयुष्याचा डाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हमीरपूर (उत्तर प्रदेश) - ज्यांना पाहूनच सर्वसमान्यांचा थरकाप उडतो अशा सापांसोबत खेळणे ज्या युवकाचा छंद होता, त्याचा बुधवारी ब्लॅक कोब्राच्या दंशाने आयुष्याचा खेळ संपला. त्याने हजारो साप पकडून त्यांच्याकडून स्वतःच्या जीभेवर दंश करुन घेतलेला होता. मात्र त्याला काहीही झालेले नव्हते. त्याचा धाडसीपणा पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला बंगल्यावर साप पकडण्याच्या नोकरीवर ठेवले होते. त्यासाठी त्याला 5 हजार रुपये पगार मिळत होता.
काय आहे प्रकरण
- या सफेऱ्याचे नाव होते रफीक अहमद. तो कानपूरमधील सिकंदरा येथील रहिवासी होता.
- साधारण 20 वर्षांचा असताना 15 वर्षांपूर्वी तो हमीरपूर येथे आला होता. जमुना घाट येथे तो राहात होता.
- लहानपणापासून त्याला विषारी सापांना पकडण्याची, त्यांच्यासोबत खेळण्याची आवड होती. त्याचे आयुष्य जणू सापांसाठी समर्पित होते.
- अशी माहिती आहे की जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात नेहमी विषारी साप निघत होते, यामुळे त्यांचे कुटुंबीय दहशतीत जगत होते.
- तत्कालिन जिल्हाधिकारी जी. श्रीनिवासलू यांनी रफीकचे किस्से ऐकले आणि त्याला बंगल्यावर नोकरीला ठेवून घेतले. त्याचे काम फक्त साप पकडण्याचे होते. त्यासाठी त्याला 5 हजार रुपये महिना मिळत होता.
- रफीकने बंगल्याच्या परिसरातून डजनभर विषारी साप पकडले होते आणि त्यांना जंगलात सोडून दिले होते.
- बेतवा आणि यमुना नदीच्या मध्ये वसलेल्या हमीरपूर शहारील घरांमध्ये निघालेले साप आणि अजगर तो लिलया पकडत होता.
- त्याने जवळपास हजार साप पकडले असतील. कमालीची बाब म्हणजे सापाकडून शरीरावर दंश करुन घेण्याची त्याची अजब सवय होती.
असा संपला सापाशी खेळणाऱ्या अवलियाच्या आयुष्याचा डाव
- बेतवा नदी किनारी एका घरात खतरनाक काळा साप निघाल्याचा फोन रफिकला आला होता. तत्काळ तो घटनास्थळी पोहोचला.
- मोठ्या मुश्किलीने त्याने तो भलामोठा काळा साप पकडला आणि त्याला घरी घेऊन आला.
- रात्री त्याने सापासोबत खेळायला सुरुवात केली.
- रफिकने सापाचे तोंड आपल्या जीभेजवळ आणले आणि त्याच्याकडून दंश करुन घेतला. सापाने त्याच्या जीभेवर दंश केल्याबरोबर रफिकची प्रकृती बिघडायला लागली.
- मोहम्मद अजीम, शब्बु आणि त्याच्या इतर काही मित्रांनी सांगितले की काळा साप एवढा खतरनाक होता की रफीकने उपाचाराआधीच प्राण सोडले.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...