आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिणीशी 'संबंध' ठेवू नको सांगूनही दम द्यायचा प्रियकर, मग भावाने उचलले हे पाऊल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलीच्या भावाने खून केल्यानंतर तिच्या प्रियकराचे डोळेही फोडले. - Divya Marathi
मुलीच्या भावाने खून केल्यानंतर तिच्या प्रियकराचे डोळेही फोडले.
बलरामपूर - जिल्ह्याच्या ललिया परिसरात खून करून मृतदेहाचे डोळे काढून घेण्याच्या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. मृताचे बहिणीशी अवैध संबंध असल्याने भावाने त्याचा खून केल्याचे पोलिसांकडे कबूल केले. याप्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 
 
असे आहे पूर्ण प्रकरण
- ही घटना 11 ऑक्टोबरची आहे. असे सांगितले जात आहे की, येथील लालजी वर्मा याचे रमेशच्या बहिणीशी अवैध संबंध होते. ही गोष्ट पूर्ण गावात पसरली होती.
- यामुळे रमेश नेहमी नाराज राहत होता. याबाबत तो लालजीला जेव्हाकेव्हा असे न करण्याचे बजावायचा, तेव्हा लालजी त्यालाच जिवे मारण्याची धमकी द्यायचा.
- लालजीचा त्रास हळूहळू वाढत गेला. यामुळे संतप्त रमेशनेही गावात होत असलेल्या बदनामीमुळे आणखी चिडून लालजीचा खून करण्याचा कट रचला. याकामी त्याने त्याचा मित्र तरुण वर्माची मदत घेतली.
- घटनेच्या दिवशी संध्याकाळी लालजी शेताकडे गेला होता. तेव्हा रमेश आणि तरुणने त्याला गाठले आणि गळा दाबून त्याचा खून केला. यानंतर त्याचे डोळे फोडून बुब्बुळंही बाहेर काढली.
- घटनेच्या नंतर दोघांनी मिळून त्याचा मृतदेह पाण्यात फेकला.
 
काय म्हणतात पोलिस?
- ललिया पोलिस स्टेशन प्रभारी देवेंद्र पांडेय म्हणाले, दोन्ही आरोपी शहराबाहेर पळण्याच्या तयारीत होते. खबऱ्याच्या माहितीवरून त्यांना रेल्वेस्टेशनवर जेरबंद करण्यात आले.
- चौकशीनंतर त्यांनी त्यांचा गुन्हा कबूल केला आहे. पुढील कारवाई सुरू आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...