आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 वर्षांनंतर पासबुक एन्ट्रीसाठी बँकेत पोहोचला हा तरुण, खात्यावरील व्यवहार पाहून हैराण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात एका व्यक्तीच्या बॅंक खात्यातून हजारो रुपयांची हेराफेरी झाल्याची घटना समोर आली आहे. - Divya Marathi
उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात एका व्यक्तीच्या बॅंक खात्यातून हजारो रुपयांची हेराफेरी झाल्याची घटना समोर आली आहे.
हमीरपूर- उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात एका तरुणाच्या बॅंक खात्यातून हजारो रुपयांची हेराफेरी झाल्याची घटना समोर आली आहे. 3 वर्षांपर्यंत खातेधारकाच्या कोणत्याही व्यवहाराविना खात्यात सतत हजारो रुपये जमा करण्यात आले आणि काढण्यातही आले. नोटबंदी दरम्यान हे व्यवहार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. हे प्रकरण समोर येताच बँक व्यवस्थापकाने चौकशी सुरु केली आहे.
 
काय आहे प्रकरण...
- सुमेरपूर येथिल रहिवाशी अनिल कुमारने पंजाब अॅन्ड सिंध बॅंकेत 3 मे 2013 मध्ये खाते उघडले होते.
- या खात्यात अनिलने दोन वेळा पाच-पाचशे रुपये जमा केले होते.
- त्यानंतर अनिलने या खात्यात पैसे जमा केले नाही आणि काढलेही नाही.
- अनिलने या खात्यातून कोणताच व्यवहार केला नाही.
- 7 जानेवारीला अनिल पासबुक एन्ट्री करण्यासाठी बँकेत गेला, तेव्हा खात्यातून 45 हजारांची देवाण-घेवाण करण्यात आल्याचे समोर आले. 
- नोटबंदी दरम्यान खात्यात 20 हजार रुपये जमा करण्यात आले आणि काढण्यातही आले.
- अनिलने बँक कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप लावत या प्रकरणाची तक्रार बँकेच्या व्यवस्थापकाकडे केली आहे.

पुढिल स्लाइडवर वाचा, याबाबत काय म्हणाला अनिल... बॅंच मॅनेजरने काय सांगितले....