आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीर: महाविद्यालयाबाहेर सुरक्षा दलावर झालेल्या दगडफेकीत 50 जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात आंदोलकांनी महाविद्यालयाबाहेर तैनात असलेल्या सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेक केली. सुरक्षा दलानेही बळाचा वापर केला. यात सुरक्षा दलासह सुमारे ५० जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणली.  
 
शनिवारी सकाळी सुरक्षा दलाने पदवी महाविद्यालयाच्या बाहेर बंदोबस्त लावला होता. हा बंदोबस्त सुरक्षेच्या कारणावरून होता. परंतु यावर नाराज लोकांनी सुरक्षा दलाच्या विरोधात निदर्शने सुरू केली.  घोषणाही दिल्या. सुरक्षा दलाच्या जवानांनी  त्यांना निदर्शने करण्यापासून रोखले. तेव्हा त्यांनी दगडफेक सुरू केली. यामध्ये सुरक्षा दलाचे जवान जखमी झाले.  खूप काळ वातावरण तणावपूर्ण होते.
बातम्या आणखी आहेत...