आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाजुद्दीनने पोटावर लाथ मारली, गर्भवती वहिणीने लावला गर्भपाताच्या प्रयत्नाचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवाजुद्दीन सि‍द्दकीच्या छोट्या भावाच्या पत्नीने पोलिसांसमोर तक्रार दिली. - Divya Marathi
नवाजुद्दीन सि‍द्दकीच्या छोट्या भावाच्या पत्नीने पोलिसांसमोर तक्रार दिली.
मेरठ/मुजफ्फरनगर - बॉलीवूड अॅक्टर नवाजुद्दीन सिद्दीकीच्या लहान भावाच्या पत्नीने नवाजुद्दीनसह संपूर्ण कुटुंबावर मारहाण आणि हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. नवाजुद्दीनने ती गर्भवती असताना पोटावर लाथ मारून तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केला असा आरोपही तिने केला आहे. तसेच केजरीवाल आणि अखिलेश यादव माझ्या खिशात आहेत. आमचे कोणी काहीही बिघडवू शकणार नाही, असाही आरोप करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण...
- हे प्रकरण मुजफ्फरनगरमधील आहे. याठिकाणी नवाजुद्दीन सिद्दीकीचे घर आहे. गेल्या आठवड्यापासून तो घरीच आहे.
- शुक्रवारी सायंकाळी उशिरा मुजफ्फरनगरचच्या एसपी ऑफिसवर नवाजुद्दीनचा छोटा भाऊ मिनाजुद्दीनची पत्नी आफरीन तिच्या आई वडिलांसह पोलिसांत तक्रार द्यायला आली होती.
- तिने नवाजुद्दीन आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली आहे.

असे आहेत आरोप...
- आफरीनने नवाजुद्दीनचे कुटुंबीय हुंज्यासाठी छळ करत असल्याचा आरोप केला आहे.
- पती मिनाजुद्दीन, दीर नवाजुद्दीन सिद्दकी, फैजुद्दीन सिद्दकी, माजुद्दीन सिद्दकी, नवाबुद्दीन सिद्दकी आणि नणंद सायमा यांच्यावर हा आरोप लावला आहेत.
- पती मिनाजुद्दीनवर अनैसर्गिक शरीर संबंध करत असल्याचा आरोपही केला आहे. विरोध केल्यास तिला मारहाण व्हायची असेही तिने पोलिसांना सांगितले.
- नवाजुद्दीनने घरातील सीसीटिव्ही कॅमेरे बंद करून तिला मारहाण केल्याचा आरोपही तिने केला आहे.
- नवाजुद्दीनने तिच्या पोटातील गर्भ पाडण्याचा प्रयत्न करत पोटावर लाथ मारल्याचा आरोप तिने केला.
- हाय प्रोफाइल प्रकरण असल्याने पोलिस तपासानंतर कारवाई करणार असल्याचे म्हणत आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटो...
बातम्या आणखी आहेत...