रेवाडी- रेवाडी येथील हंस नगरमध्ये सोमवारी सकाळी एकतर्फी प्रेमातून युवतीच्या पोटात चाकू हल्ला करुन युवकाने तिला गंभीर जखमी केले व नंतर त्याने विष घेतले. दोघांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मंगळवारी युवकाचा मृत्यू झाला.
- 29 वर्षीय युवती एका एनजीओमध्ये सर्व्हेअर म्हणून काम करत होती.
- मृतक बबलू (31) विवाहीत होता. मात्र, त्याने पत्नीला सोडचिठ्ठी दिली होती.
- युवती एनजीओच्या सर्वेसाठी जात होती. तेव्हा तिच्यावर युवकाने चाकूहल्ला केला.
- परिसरातील लोकांनी बबलूला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र, त्याने विष घेतले.
- त्याने लोकांना धमकी दिली की, मी विष घेतले आहे. मला पकडल्यास तुम्ही फसाल.
- त्यामुळे काही लोकांनी त्याला सोडले व युवतीला हॉस्पिटलमध्ये नेले.
- सुमारे तासभरानंतर बबलू कंटेनर डेपोजवळ पडलेला दिसला.
- त्याने दारूमध्ये विष घेतले होते.
- बबलूने एकतर्फी प्रेमातून हे पाऊल उचलल्याचे सांगितल्या जात आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, प्रकरणाशी संबंधित फोटो..