आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅच दरम्यान भांडण, बॅटने मारुन-मारुन 20 वर्षीय क्रिकेटरची हत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीकाकुलम (आंध्रप्रदेश) - येथील एका क्रिकेट सामन्यादरम्यान 20 वर्षांच्या क्रिकेटरला एवढी मारहाण झाली त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. श्रीकाकुलम जिल्ह्यातील बोंडिलिपुरम गावात रविवारी सायंकाळी झालेल्या सामन्यादरम्यान पी. अजयकुमार या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची पामुल किशोर याने बॅटने मारहाण करुन हत्या केली. या मारहाणीचे प्रत्यक्षसाक्षीदार असलेल्या लोकांनी सांगितले, की पामुल किशोरने अजयकुमारला बॅटने एवढे मारले की जागेवरच त्याचे त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी फरार झाला.

शुल्लक कारणावरुन झाले भांडण
बोंडिलिपुरम गावातील मैदानावर दोन संघामध्ये क्रिकेट सामना सुरु होता. त्यावेळी दोनी संघातील खेळाडूंमध्ये शुल्लक कारणावरुन भांडण सुरु झाले. ते एवढे विकोपाला गेले, की पामुल किशोरने प्रतिस्पर्धी संघाच्या अजयकुमारवर बॅटने हल्ला केला. त्याच्या सहकारी खेळाडूंनी अजयकुमारला राजीव गांधी इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हॉस्पिटलमध्ये आणले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. अजय सन डिग्री इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी होता.
बातम्या आणखी आहेत...