आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Youth Art And Literature Sammelan Organise In Hyderabad

हैदराबादेत युवा कला आणि साहित्य संमेलनाचे आयोजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - येथे दुसरे युवा कला आणि साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी आयोजित या संमेलनात खास करून मराठवाडा आणि सोबतच राज्यातील बडे कलावंत, साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. या वेळी महाराष्ट्रातील युवकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हैदराबाद शहरात मराठी लोकांची संख्या मोठी आहे. काही भागांत मराठी भाषकच राहतात. मात्र, युवा पिढीपासून मराठी भाषा दूर जात आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी गेली 13 वर्षे कार्यरत कलाभिषेक परिवार आणि मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश यांनी युवा कला आणि साहित्य संमेलन आयोजित केले आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रातील मराठी युवकांशी हैदराबादेतील युवकांचा संवाद व्हावा, शिवाय कला, साहित्य, संस्कृतीची नाळ जोडलेली राहावी यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे कलाभिषेक परिवाराच्या संस्थापक अध्यक्षा सरोज घारीपुरीकर यांनी सांगितले.
केशव मेमोरियल शिक्षण संस्था परिसर, नारायणगुडा येथे हे संमेलन होत असून संमेलनाचे उद्घाटन मुंबईचे प्रसिद्ध लेखक, कवी, गीतकार प्रवीण दवणे यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय दोन दिवस कला आणि साहित्याची मेजवानी मिळणार असल्याचे मराठी साहित्य परिषद आंध्र प्रदेशच्या कार्यवाह डॉ. विद्या देवधर यांनी सांगितले.