आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफूची शेती सोडून युवक डॉक्टर, इंजिनिअर होतायत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची - कधीकाळी ‘अफगाणिस्तान’ असा कलंक म्हणून ओळखल्या जाणा-या पत्थलगडाचे लोक आता अभिमानाने छाती फुगवून फिरताना दिसतात.अफूची शेती व त्याच्याशी संबंधित गुन्हेगारी सावटाखाली जगत असलेल्या येथील युवकांनी ही परिस्थिती बदलली आहे. येथील युवक आता डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ होत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे येथील अफूची शेतीही बंद झाली आहे.


मिथिलेशकुमारने मोहाची फुले वेचून शिक्षण घेतले. इंटरमीजिएट परीक्षेत तो जिल्ह्यात पहिला आला. टेलर नागेश्वर साहू यांचा मुलगा दीपक डॉक्टर बनला आहे. तर साधारण शेतकरी असलेल्या ज्ञानी दांगी यांचा मुलगा आशिषकुमार इंजिनिअर बनला आहे. अन्य दोन शेतकरी पुरन दांगी व देव महातो यांचे पुत्र सुबोध व रॉकी यांनीही इंजिनिअर होऊन घरची परिस्थिती सुधारण्यास मदत केली. तर सुमीतकुमारने हा बंगळुरू येथे शास्त्रज्ञ असून संशोधनासाठी त्याचा अमेरिकेत गौरव झाला आहे.


पत्थलगडामध्ये भाजीपाल्याची शेती खूप चांगली होत होती. अनेक वर्षांपूर्वी कुणीतरी सांगितले की, अफूच्या शेतीत खूप फायदा आहे. सगळे त्याच्याच मागे लागले. एक वेळ अशी आली होती की सर्व युवक अफूच्या शेतीसाठी तुरुंगात गेले होते. कुटुंबीय त्रस्त होते. नंतर युवकांनी हा कलंक पुसण्याचा निश्चय केला.


असा झाला बदल
पत्थलगडाच्या तीन सेवानिवृत्त शिक्षकांनी या बदलात महत्त्वाची भूमिका पार पाडली. बलदेव राम दांगी, अर्जुनप्रसाद सिन्हा व धनुषधारी राम दांगी यांनी युवकांना वेळेचे नियोजन शिकवले. त्यांचे मतपरिवर्तन केले. शेती करून ते शिक्षण कसे घेऊ शकतात, हे शिकवले. हे शिक्षक विद्यार्थ्यांना इंग्रजी, दुसरी भाषा नि:शुल्क शिकवतात. त्याचे परिणाम आता दिसून येत आहेत.