आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेयसीला संपवून त्‍यानेही ब्‍लेडने केले मानेवर वार, तिच्‍या घरच्‍यांना म्‍हणाला मृतदेह घेऊन या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर- प्रेयसीचे नातेवाईक लग्‍नासाठी तयार झाले नाहीत म्‍हणून एका युवकाने आधी त्‍याच्‍या प्रेयसीची गळा दाबून हत्‍या केली. नंतर स्‍व:ता आत्‍महत्‍या करण्‍यासाठी ब्‍लेडने हाताची नस कापली. त्‍यानंतर वस्‍तीत जाऊन त्‍याने सांगितले की, मी प्रेयसीची हत्‍या केली आहे. तिचा मृतदेह बाहेर काढा. काय आहे प्रकरण....

- ग्वाल्हेरच्‍या संजयनगर भागातील सतपाल माहौर व मनीषा यांच्‍यात प्रेम होते.
- दोघांची लग्‍न करण्‍याची इच्‍छा होती. पण मनीषाच्‍या घरुन विरोध होता.
- मनीषाच्‍या नातेवाईकांनी तिचे लग्‍न दुस-या मुलाशी ठरवले होते.
- सतपालने मनीषाच्‍या नातेवाईकांना समजावण्‍याचा प्रयत्‍न केला.
- मनीषाचे नातेवाई राजी होत नव्‍हते. शेवटी सतपालने मनीषाला संपवले.
- बुधवारी रात्री सतपाल आणि मनीषा संजयनगर परिसरात भेटले.
दोघांनी केला आत्‍महत्‍येचा प्‍लॅन....
- दोघांनी आत्‍महत्‍या करण्‍याचे ठरवले होते.
- सतपालने आधी मनीषाचा गळा घोटून हत्‍या केली. नंतर त्‍याची नस कापून घेतली.
- सतपालने नंतर त्‍याच्‍या गळ्यावरही ब्‍लेडने वार केले.
- सतपाल जखमी अवस्‍थेत मनीषाचे वडील सुनील कुशवाह यांच्‍याकडे गेला.
- तुमच्‍या मुलीचे प्रेत डोंगरात आहे, असे त्‍याने सांगितले.
- जखमी सतपालला तत्‍काळ हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले.
- सतपालची परिस्‍थिती चिंताजनक असल्‍याची माहिती आहे.
पोलिसांकडून गुन्‍हा दाखल....
-जनकगंज पोलिसांनी सतपाल विरोधात हत्‍या आणि आत्‍महत्‍येचा गुन्‍हा दाखल केला.
-सीएसपी दीपक भार्गव यांनी सांगितले की, सतपालची प्रकृती ठीक होण्‍याची वाट पाहली जात आहे. त्‍यानंतरच या प्रकरणाची चौकशी होईल.

पुढील स्लाइड्समध्‍ये पाहा, घटनेशी संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...