आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CCTV मध्ये कैद लाइव्ह मर्डर: भर रस्त्यात चाकू-लाठ्या-काठ्याने युवकाचा खून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विकासच्या घरासमोर अवैध दारुविक्रीचा धंदा सुरु होता. याला विकासचा कडाडून विरोध होता. - Divya Marathi
विकासच्या घरासमोर अवैध दारुविक्रीचा धंदा सुरु होता. याला विकासचा कडाडून विरोध होता.
चंदीगड - चाकू, लाठ्या-काठ्या घेऊन भर बाजारात मुलांचे एक टोळके येते आणि एका निशस्त्र मुलावर हल्ला होता. घरासमोर सुरु असलेल्या अवैध दारुविक्रीला त्याने केलेल्या विरोधाची तो किंमत चुकवत असतो. 18 वर्षांचा विकास उर्फ कन्हैय्याला हा विरोध फार महागात पडतो. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या कन्हैय्याचा बुधवारी सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू होतो. मारहाणाची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे.

काय आहे प्रकरण

अवैध दुरु विक्रीच्या व्यवसायाला केला होता विरोध

- विकास उर्फ कन्हैय्या सेक्टर 25 मध्ये राहातो. वडील तेजपाल, आई सुनीता आणि दोन बहिणी असे त्याचे कुटुंब होते.
- विकासच्या घरासमोर अवैध दारुविक्रीचा धंदा सुरु होता. याला विकासचा कडाडून विरोध होता.
- काही दिवसांपूर्वी त्याचे काही मुलांसोबत भांडण झाले होते, त्यानंतर त्यांच्या घरावर दगडफेकही झाली होती.
- या घटनेनंतर पोलिसांनी तेजपाल आणि त्यांचा मुलगा विकास यांनाच अटक केली होती, असे विकासचे काका ओ.पी. द्रविड यांनी सांगितले.

समोसे खाण्यासाठी थांबला तेव्हा झाला हल्ला
- सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या विकासला मागील आठवड्यातच पोलिसांनी सोडले होते.
- बुधवारी विकास काही मित्रांसोबत भाजी खरेदी करण्यासाठी बाजारात गेला होता.
- तिन्ही मित्र भाजी खरेदी करण्यापूर्वी समोसा खाण्यासाठी थांबले होते. तेव्हाच मागुन आलेल्या तरुणांच्या टोळक्याने त्याच्यावर हल्ला केला.

पुढील स्लाइडमध्ये पाहा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...