आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दृष्टिहीनांना वाट दाखवणारे उपकरण, वाटेतील अडचणींची मिळणार सूचना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - दृष्टिहीनांना चालता-फिरताना काठीची मदत घ्यावीच लागते; परंतु चंदिगडच्या अभिनव वर्मा नावाच्या तरुणाने एक वेगळ्या प्रकारचे उपकरण विकसित केले आहे. हे उपकरण बाळगणाऱ्यांना प्रत्येक वेळी काठी घेऊन फिरण्याची गरज भासणार नाही. अंगठीसारखे हे उपकरण असून आजूबाजूला ४ मीटर क्षेत्रात आलेल्या अडचणीची सूचना यातून मिळते.

अभिनवला हे उपकरण तयार करण्यास एक वर्ष एवढा कालावधी लागला. लवकरच अभिनव एका कंपनीची स्थापना करणार आहे. त्याद्वारे या उपकरणाची निर्मिती केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यासाठी सहकार्य घेतले जाणार आहे. उपकरणाची इलेक्ट्रॉनिक डिझायनिंग परदेशात होणार आहे. असेंब्लिंग मात्र भारतात केली जाणार आहे. चितकारा विद्यापीठ राजपुरामध्ये बीटेक मेकॅनिकलच्या चौथ्या वर्षातील िवद्यार्थी अभिनवने स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हे उपकरण तयार केले होते. सप्टेंबर २०१३ मध्ये हाँगकाँगमध्ये आयोजित एका कार्यक्रमात (‘डिझाइन फॉर व्हिज्युअली चॅलेंज्ड’) त्याचा समावेश करणअयात आला होता. जानेवारीत मुंबईत झालेल्या इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये कलाम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरदेखील हे उपकरण सादर करण्यात आले होते.

उपकरण असे काम करते
हे उपकरण ध्वनीच्या नियमावर चालते. त्यात दोन स्पीकर आहेत. ट्रान्समिटर आणि रिसीव्हरचे काम करते. त्याचबरोबर मायक्रोचिप त्यास सिग्नल देण्याचे काम करेल. त्यामुळे चार मीटरच्या क्षेत्रात व्यक्तीच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही अडथळ्याला आेळखून त्याचा इशारा देण्याचे काम हे उपकरण करते. त्याला यूएसबी किंवा फोन चार्जरने चार्ज केले जाऊ शकते. त्याची किंमत सुमारे २ हजार रुपये आहे. हाफकेनसह त्याची खरेदी केल्यास ते ३ हजार रुपयांना पडेल.

अशी सुचली कल्पना
अभिनव म्हणाला, त्यांना विद्यापीठात अंध लोकांसाठी एक उपकरण तयार करण्याचे आव्हान देण्यात आले होते. त्या वेळी दोन वर्गमित्रांच्या मदतीने एक डमी ग्लव तयार करण्यात आले. त्यात बोटावर एक सेन्सर होता. त्यानंतर दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठाच्या मदतीने आयोजित राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभाग घेतला. तेथे वर्किंग मॉडेलचा सल्ला मिळाला.
बातम्या आणखी आहेत...