आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमध्ये मौजमजेसाठी युवकांकडून किडनी विक्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आणंद - गुजरातमध्ये सध्या आंतरराष्ट्रीय किडनी रॅकेटची जोरदार चर्चा आहे. येथे कोणी ऑटोरिक्षा, तर कोणी विमा काढण्यासाठी किडनी विकल्याचे उघडकीस येत आहे. आणंद जिल्ह्यातील या रॅकेटचे कनेक्शन थेट श्रीलंकेपर्यंत पोहोचले आहे.
चौकशीनुसार, श्रीलंकेत एका किडनीसाठी ४० ते ५० लाखांपर्यंत रक्कम देण्यात आली. मात्र, दात्याला त्यापैकी फक्त २ ते ३ लाखेच मिळाले. या प्रकरणी किडनी रॅकेटच्या म्होरक्यासह तिघांना अटक झाली आहे. आणंद जिल्ह्यातील ज्या ९ जणांनी किडनी विकली त्यापैकी काहींनी ऑटोरिक्षा, तर काहींनी जीवन विमा पॉलिसी काढल्याचे उघडकीस आले आहे. काहींनी तर मौजमजेसाठी पैसे हवेत म्हणून किडनीचा सौदा केला.
तोतया डॉक्टर काढायचा किडनी
मुख्य आरोपी मुकेश ऊर्फ मुकुल चौधरीला आणंदच्या वडोलमधून अटक झाली. मुकुल हा तोतया आयुर्वेदिक डॉक्टर होता. त्याने स्वत:चीही किडनी विकली आहे. अहमदाबादचा शेरू पठाण आणि आणंदचा रफिक वोरा यांनी या नऊ जणांना किडनी विकण्यासाठी राजी करवून घेतले होते.
यापैकी बहुतांश किडन्या श्रीलंकेत पाठवण्यात आल्या. श्रीलंका सध्या किडनी प्रत्यारोपणाचे हब बनले आहे. २०१५ मध्ये या ठिकाणी ६३० किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे किडनी दान करणाऱ्यांमध्ये ५०३ भारतीय नागरिक होते.
वहिनींच्या उपचारासाठी दिराने विकली किडनी
२५ वर्षीय अरविंदने वहिनीच्या उपचारासाठी २ लाख २५ हजार रुपयांत किडनी विकली. त्यापैकी १ लाख रुपये उपचारावर खर्च केले, तर प्रत्येकी ५० हजारांच्या दोन विमा पॉलिसी विकत घेतल्या. फेब्रुवारी २०१५ मध्ये त्याने किडनी विकली.
बातम्या आणखी आहेत...