आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Youth Wearing Pakistan's T Shirt In Moharam Julus

युपी : मोहरम जुलूसमध्ये पाकिस्तानी टीमचे टी शर्ट घालून मिरवले तरुण, परिसरात तणाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : पाकिस्तानी क्रिकेट संघाचे टी शर्ट परिधान करून जुलूसमध्ये सहभागी झाले तरुण

गोरखपूर/ कुशीनगर - युपीच्या कुशीनगरमध्ये मोहरमच्या जुलूमध्ये काही तरुणांनी पाकिस्तानी क्रिकेट संघाचे टी शर्ट परिधान केल्याची आणि पाकिस्तानचे झेंडे फिरवत घोषणाबाजी केल्याचे प्रकरण गंभीर वळण घेताना दिसत आहे. या प्रकारामुळे परिसरात तणाव पसरत असल्याने पोलिसांनी सुरक्षाव्यवस्था अधिक कडक केली आहे.

कुशीनगरच्या कुबेरस्थानमधील कल्याण छप्पर गावात मंगळवारी ही घटना घडली. येथे मोहरमच्या जुलूसदरम्यान दहा ते बारा तरुणांनी पाकिस्तानचे टी शर्ट परिधान केले होते. त्यावर काही लोकांनी आक्षेप घेतला. त्यामुळे वाद वाढला व धक्काबुक्की झाली. पोलिस घटनास्थली पोहोचले व त्यांनी या मुलांना टी शर्ट काढण्यास भाग पाडले. आता हे टीशर्ट या मुलांकडे कसे आले, याचा शोध पोलिस घेत आहेत.
दूसरे प्रकरण रामकोला येथील आहे. येथे मोटारसायकलवरून आलेल्या काही तरुणांनी पाकिस्तानचे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.

बरेलीमध्ये जातीय तणाव
बरेलीच्या बिथरी चैनपूरपासून जवळच ताजिया जुलूसचा मार्ग बदलण्याची जिद्द करणा-या लोकांमध्ये अचानक एक दगड पडल्याने मंगळवारी मोठा तणाव निर्माण झाला. या प्रकारानंतर दोन्ही बाजुचे लोक समोरासमोर आले. त्यांच्यात सुमारे अर्धा तास दोन्ही बाजुने दगडफेक झाली. त्यात काही घरांची तोडफोड झाली. काही आंदोलकांनी दोन कार आणि पाच मोटारसायकलची तोडफोडही केली. त्यात होमगार्डच्या जवानांसह 20 जण जखमी झाले आहेत. काही लोकांनी घटनास्थळी फायरिंग झाल्याचेही सांगितले. पण पोलिसांनी त्याला दुजोरा दिलेला नाही. दोन्ही बाजुंच्या सुमारे 40 जणांना पोलिसांनी अटक केली. पोलिस आयुक्त, महानिरीक्षक यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी बराचवेळ घटनास्थली तळ ठोकून होते. ।


पुढे पाहा, यासंबंधीचे आणखी काही PHOTO