आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखंड आंध्र प्रदेशसाठी वायएसआर कॉँग्रेसचा लढा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - वायएसआर कॉँग्रेसने रविवारी अखंड आंध्र प्रदेशासाठी उघड पाठिंबा दर्शवत पक्ष यासाठी बांधिल असल्याचे जाहीर केले आहे. राज्यातील नागरिकांना लिहिलेल्या जाहीर पत्रात वायएसआर कॉँग्रेसच्या मानद अध्यक्ष वायएस विजयम्मा यांनी अखंड आंध्रसाठी पक्ष लोकांच्या मागे उभा राहिल, असा विश्वास व्यक्त केला.

पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात वायएसआर कॉँग्रेससह माकपा व एमआयएम पक्षांनी अखंड आंध्रला पाठिंबा दिला आहे. पक्षप्रमुख जगनमोहन यांची बहीण शर्मिला अखंड आंध्रसाठी यात्रा काढणार आहेत. कॉँग्रेस, तेदपा, भाजप, टीआरएस आणि भाकपा या पक्षांचा विभाजनाला पाठिंबा आहे.