आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yuvraj Singh's FiancéE Hazel Keech Bats For Him, Gets Trolled On Twitter

युवीला बॅटिंगची संधी न मिळाल्याने भडकली हेजल, फॅन्स म्हणाले- क्रिकेट समजून घे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युवराजसोबत हेजल किच (फाइल फोटो) - Divya Marathi
युवराजसोबत हेजल किच (फाइल फोटो)
चंदीगड - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सामन्यात युवराजसिंगला बॅटिंगची संधी न मिळाल्यामुळे त्याची होणारी पत्नी हेजल कीच भडकली आहे. मनात साचलेला सगळा राग हेजलने सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरवर व्यक्त केला. त्यानंतर टीम इंडियाच्या फॅन्सनी तिची खरडपट्टी केली, तर काही चाहत्यांनी टीम मॅनेजमेंटचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे.

का नाही मिळाली फलंदाजीची संधी
टीममध्ये असताना युवराजला बॅटिंगची संधी का मिळाली नाही ? असा सवाल हेजलने ट्विटरवर विचारला आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये ती म्हणते, 'लोकांना केव्हा कळेल की युवराजला बॅटिंगची संधी मिळाली आहे ?'

नंतर डिलिट केले ट्विट
- हेजलच्या ट्विटवरुन सोशल मीडियामध्ये वाद वाढल्यानंतर तिने ते डिलिट केले.
- हेजलच्या ट्विटवरुन अनेक युजर्सनी तिच्या क्रिकेटबद्दलच्या सामान्य ज्ञानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर काहींनी तिच्या वक्तव्याचे समर्थन केले.
- एकाने ट्विट केले, की हेजल तुला आधी क्रिकेट समजून घेण्याची गरज आहे. सासरे योगराजसिंग यांच्यासारखे वागणे सोडून दे.

युवराजनेही म्हटले होत, क्रिकेट समजत नाही तेच चांगले आहे
साखरपुड्यानंतर युवराजला हेजलच्या गुणांबद्दल विचारले होते, तेव्हा त्याने सांगितले होते, 'तिला क्रिकेट समजत नाही हेच सर्वात चांगले आहे. युवी म्हणाला होता, मला तिच्यात माझ्या आईची छबी दिसते, त्यामुळे ती मला आवडली.'
पुढील स्लाइडमध्ये पाहा, हेजल किचचे ट्विट आणि फॅन्सनी त्यावर दिलेल्या प्रतिक्रिया