आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलीपूर गावात डीएसपी हक यांना झाली होती जबर मारहाण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतापगड- उत्तर प्रदेशमध्‍ये पोलिस उपअधीक्षक झिया उल हक यांच्‍या हत्‍येमागील धागेदोरे उलगडण्‍यास सुरुवात झाली आहे. हक यांना नन्‍हे यादव यांचे भाऊ तसेच संतप्‍त जमावाने जबर मारहाण केली होती. मात्र, या दोघांनी हक यांची हत्‍या केल्‍याचे नाकारले आहे. सीबीआयच्‍या तपासात ही माहिती उघड झाली आहे.

कुंडा येथील बलीपूरमध्‍ये 2 मार्चला हक यांची हत्‍या करण्‍यात आली होती. त्‍याच गावात सरपंच नन्‍हे यादव यांची हत्‍या करण्‍यात आली होती. यादव यांचे भाऊ पवन आणि सुधीर यांनी मारहाण केली होती. याशिवाय यादव यांच्‍या पुत्रानेही मारहाण केली होती. घटनास्‍थळी आपण नव्‍हतोच, असे पवन आणि सुधीर यांनी आधी नोंदविलेल्‍या जबाबमध्‍ये सांगितले होते. परंतु, आता त्‍यांनी हक यांना मारहाण केल्‍याचे मानय केले आहे. परंतु, त्‍यांची हत्‍या केल्‍याचे या दोघांनी नाकारले आहे.

पवन आणि सुधीर यांनी सीबीआयला सांगितले की, नन्‍हे यादव यांचा मृतदेह नेण्‍यासाठी हक गावात दाखल झाले त्‍यावेळी जमावाने त्‍यांना विरोध केला. काही क्षणातच जमाव हिंसक झाला. त्‍यावेळी हक यांनी तिथून निघण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍याचवेळी पवन, सुधीर आणि नन्‍हे यादवच्‍या मुलाने त्‍यांना पकडले. त्‍यानंतर त्‍यांनी आणि जमावाने हक यांना जबर मारहाण केली.