(फोटो- ट्रेनसमोर सापडलेला युवतीचा मृतदेह.)
जीरकपूर (पंजाब)- ढकोली रेल्वे फाटकापासून सुमारे 300 मीटर दूर अंतरावर 27 वर्षीय विवाहित महिलेने रेल्वेसमोर उडी मारुन जीव दिला. मृतदेहाजवळ मिळालेल्या पासपोर्टवरुन महिलेची ओळख पटवण्यात आली. ती सासूसोबत एकटी राहत होती. तिचा पती ऑस्ट्रेलियात तर सासरा अमेरिकेत राहतो. तिने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे, की माझ्यात उणिवा आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव इंदरपाल कौर आहे. जीरकपूर येथील बालाजी एन्क्लेव इमारत क्रमांक 14 फेज वनमध्ये ती राहत होती. तिच्या मृतदेहाजवळ एक बॅगही मिळाली आहे. त्यातील सामान सुरक्षित असून त्यात पासपोर्ट आणि सुसाईड नोट मिळाली आहे. इंदरपाल पदवीधारक आहे. तिच्या पतीचे नाव हरज्योतसिंग आहे. तो ऑस्ट्रेलियात नोकरीनिमित्त राहतो. त्याचे वडील अमेरिकेत राहतात. सासूसोबत ती येथे राहत होती. पासपोर्टची चौकशी करायची आहे, असे सांगून ती घरुन निघाली होती. ढकोली रेल्वे फाटकाजवळ लोकांनी तिला ऑटोतून उतरताना बघितले होते. तिच्या कुटुंबीयांनी कोणतीही पोलिस तक्रार दिलेली नाही.
सुसाईड नोटमध्ये लिहिले, घरवाले चांगले आहेत
माझ्या मृत्यूला मी जबाबदार आहे. माझ्यात अनेक उणिवा आहेत. मी प्रगती करु शकले नाही. माझ्या कुटुंबातील लोक चांगले आहेत. त्यांना जबाबदार धरु नये. माझ्या उणिवांसाठी मी स्वतः जबाबदार आहे. सुसाईड नोटवर तिची स्वाक्षरी नाही. ही नोटही अपुर्ण आहे. शेवटचे वाक्य अपूर्ण आहे. याच्या पाठपोट लिहण्यात आले आहे.
पुढील स्लाईडवर बघा, इंदरपाल कौरचा फोटो, पासपोर्ट आणि सुसाईड नोट...