आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थीनींवर फेकले विर्याने भरलेले फुगे, होळीच्या दिवशी तरूणींसोबत गैरकृत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्ली युनिवर्सिटीतील जीसस अँड मेरी कॉलेजच्या दोन विद्यार्थींनींवर विर्याने भरलेले फुगे फेकल्याची घटना समोर आली आहे. या विरोधात विद्यार्थीनी आणि शिक्षकांनी दिल्ली पोलिस मुख्यालयासमोर प्रदर्शन केले. विद्यार्थीनींनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, होळी सेलिब्रेशन दरम्यान दिल्लीमध्ये महिला आणि तरूणींवर विर्याने भरलेले फुगे फेकण्यात येत आहे. पोलिस व्यवस्था, पेट्रोलिंग आणि तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी या निवदेनातून केली आहे.


असे आहे प्रकरण...
- विद्यार्थीनींच्या हातात जे पोस्टर होते, त्यात लिहिले होते की, होळीच्या दिवशी छेडछाड आणि गैरकृत्य होत असतील तर त्याचे वाईट का वाटू नये. विद्यार्थींनींवर विर्याने भरलेले फुगे फेकल्याच्या कृत्याच्या विरोधात सर्वांनी जोरदार प्रदर्शन केले.
- विद्यार्थीनींनी आरोप केला आहे की, दिल्ली पोलिस गैरकृत्य करणाऱ्यांना थांबवण्यासाठी कुठलीही कार्यवाही करत नाही आहेत.
- तसेच, लेडी श्रीराम कॉलेजच्य दोन विद्यार्थीनींनी देखील या प्रकरणी तक्रार दखल केली आहे.
- मुख्यालयात पोलिसांविरोदात घोषनाबाजी करणाऱ्या प्राध्यापिका माया जॉन यांनी सांगितले की, बसमध्ये देखील गैरकृत्याचा सामना करावा लागतो.


महिला कॉलेजच्या विद्यार्थीनींनी देखील एक दिवस आधी केली होती तक्रार...
- दिल्ली विद्यापीठाशी संलग्नीत असलेले कॉलेज फॉर वुमनच्या विद्यार्थीनींनी देखील एक दिवस आधीत विर्याने भरलेले फुगे फेकल्याची तक्रार दाखल केली होती.
- विद्यार्थिनींनी कॉलेजजवळील दोन मजली इमारतीतून विर्याने भरलेले फुगे फेकल्याचा आरोप केला आहे.


पुढील स्लाइडवर पाहा पोलिसांना दिलेल्या निवेदनात काय म्हटले आहे....

बातम्या आणखी आहेत...