आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धान्यासारखे बटाटे साठवता येतील अनेक महिने, एअरोपॉनिक टेक्नॉलॉजीने झाले साध्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालंधर (पंजाब)- नॅशनल पोटॅटो रिसर्च सेंटरने बटाट्यांना वाळवून बऱ्याच कालावधीसाठी ठेवण्याची पद्धत शोधून काढली आहे. सेंटरचे प्रमुख डॉ. जोगिंदर मिन्हास यांनी सांगितले, की धान्याला जशा प्रकारे डब्यांमध्ये वाळवून ठेवले जाऊ शकते अगदी तसेच बटाट्यांनाही वाळवून ठेवता येईल. सेंटरने अशा प्रकारच्या बटाट्यांचा पेटंट मिळवला आहे.
याबाबत डॉ. मिन्हास यांनी सांगितले, की विजेचा खर्च करुन कित्येक महिने बटाटे कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवले जाऊ शकतात. त्यामुळे आम्ही बटाट्यांना वाळवण्याची पद्धत शोधून काढली. भारतीय पद्धतीने बटाटे वाळवले तर आतील एक भाग टणक होतो. त्यामुळे जेव्हा हे बटाटे आपण शिजवतो तेव्हा तो भाग दगडासारखे लागतो. आम्ही बटाट्यांना दोन भागात खास पद्धतींनी वाळविले. वाळविलेले बटाटे पाण्यात भिजवल्यावर पुन्हा ताजेतवाने होतील. त्यांचा तोच स्वाद आपल्याला मिळेल.
डॉ. मिन्हास, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आशिव मेहता आणि टेक्निशिअन योगेश गुप्ता यांच्या नावावर या बटाट्यांचे पेटंट रजिस्टर करण्यात आले आहे. आता याचे व्यावसायीक लायसन्स दिले जाऊ शकते.
असे घेतले जाते बटाट्याचे पिक
मातीचा वापर न करता पिक घेण्यासाठी थर्माकोलच्या पातळ चादरींमध्ये रोप लावले जातात. याची मुळे खाली हवेत वाढतात. 16 आवश्यक तत्वांचा वापर करुन रोप मोठे केले जाते. यामुळे जमिनीत जेवढे उत्पन्न मिळते त्याच्या आठपट जास्त उत्पन्न या पद्धतीने मिळते. शिवाय रोपांना कोणत्याही प्रकारची किड लागत नाही.
एअरोपॉनिक टेक्नॉलॉजिचे इन्चार्ज डॉ. सुखविंदर चाहल यांनी सांगितले, की आम्ही अनेक कंपन्यांना हे तंत्रज्ञान दिले आहे. पाच वर्षांत या तंत्रज्ञानाने बटाट्यांच्या शेतीत अमुलाग्र बदल होतील.
पुढील स्लाईडवर बघा, या तंत्रज्ञानाने अशा उगवल्या जातात भाज्या....