आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AIIMS Report Punjab Absorbs 7500 Worth Drugs Comes From Pak ISI Supports

एम्सचा रिपोर्ट: पंजाबात पाकमधून येते 7,500 कोटी रूपयांची ड्रग्ज, ISI चा सपोर्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंडीगढ - एअरबेस हल्‍ल्यानंतर आता पाकिस्‍तानात स्मगलर्स आणि दहशतवाद्यांमध्‍ये युती असल्‍याची माहिती समोर आली आहे. एम्सच्‍या रिपोर्टनुसार पंजाबमध्‍ये दरवर्षी 7,500 कोटी रूपयांच्‍या ड्रग्जची उलाढाल होते. यामध्‍ये 6,500 कोटी रूपयांच्‍या हेरोइनचा समावेश असतो. हे सर्व अमली पदार्थ पाकच्‍या सिमेवरून भारतात येतात, असेही या अहवालात म्‍हटले आहे.
पाकच्‍या गुप्‍तहेर संस्‍था करतात तस्‍करांना मदत...
- एम्सच्‍या राष्ट्रीय अंमली पदार्थ अवलंबन उपचार केंद्राने (एनडीडीटीसी) हे पहिले सर्वेक्षण केले.
- सर्वेक्षणानुसार पूर्ण हेरोइन ही पाकिस्‍तानातून भारतात येते.
- अमली पदार्थांच्‍या तस्‍करांना गुप्‍तहेर संस्‍था मदत करतात.
- असेही म्‍हटले जात आहे की, एअरबेस हल्‍ल्यासाठी दहशतवाद्यांनी तस्‍करांच्‍या नेटवर्कची मदत घेतली.
- सुरक्षा संस्थांनी म्‍हटले, पाकिस्तानातून येणा-या हेरोइनची विक्री पंजाबमध्‍ये होत नाही. दिल्लीसारख्‍या महानगरांमध्‍ये हे अमली पदार्थ आणले जातात.
अशी आहे तस्‍करांची धोकादायक खेळी..
- स्मगलर्स हे केवळ दहशतवाद्यांना भारतात मदतच करत नाहीत. शिवाय पंजाबमध्‍ये सैनिकांना अमली पदार्थांचे व्यसनाधीन बनवत आहेत.
- एनडीडीटीसीच्‍या अभ्यासानुसार, पंजाबच्या लोकसंख्‍येच्‍या (2.77 कोटी) 0.8% ( सुमारे 2.3 लाख) अफूच्‍या आहारी गेले आहेत.
- रिपोर्टनुसार पंजाबमध्‍ये हेरोइन घेणारे लोक 1.23 लाख आहेत.
- पंजाबमध्‍ये होणारी ड्रग्‍ज विक्री तपासण्‍यासाठी 6 जानेवारीला केलेला अभ्‍यास राज्‍याचे आरोग्‍य मंत्री सुरजीकुमार ज्ञानी यांच्‍यासमोर ठेवण्‍यात आला.
कुणी केले सर्वेक्षण?
- एनडीडीटीसी आणि दिल्लीची सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ यूथ अॅन्‍ड मासेसने हे सर्वेक्षण केले.
- फेब्रुवारी-एप्रिल 2015 दरम्‍यान हा अभ्‍यास करण्‍यात आला. यामध्‍ये 18 ते 35 वर्ष वयोगटातील लोकांना सहभागी करण्‍यात आले.
- पंजाबच्‍या 10 जिल्‍ह्यातून 3,620 जणांची माहिती गोळा करण्‍यात आली.
- या अभ्‍यासानुसार 100 पैकी 4 लोक हे या व्‍यसनाधीन आहेत. तर, 100 पैकी 15 लोक केवळ नशा करतात.
- सर्वेक्षणाचे नेतृत्‍व करत असलेले डॉ. अतूल अंबेडकर यांच्‍या माहितीनुसार, पंजाबमध्‍ये ड्रग्‍ज इंजेक्शन घेणा-यांची संख्‍या सुमारे 75 हजार आहे.
- यामुळेच पंजाबमध्‍ये एड्स पसरण्‍याचा धोकाही मोठ्या प्रमाणात आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, - ड्रग्जसाठी पंजाबमध्‍ये दिवसाला किती कोटी येतो खर्च..