आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • American Indian Ratna Gill Opens NGO To Teach Students From Poor Family

वॉशिंग्टनवरुन आली Havard ची 21 वर्षीय तरुणी, शिकवते गरीब विद्यार्थ्यांना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुधियाना (पंजाब)- एकिकडे भारतातील सुसंस्कृत समाज विदेशी जाऊन कोट्यवधी रुपयांची माया जमवताना दिसत असताना दुसरीकडे मायदेशी आल्यावर गरीब विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याची ऊर्मी एक 21 वर्षीय युवती जागवत आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये जन्म झालेली रत्ना गिल वयाच्या 13 व्या वर्षीच भारतात आली होती. लुधियानात तिने ‘ज्ञान घर’ नावाची समाजसेवी संस्था सुरु केली आहे. याच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना निःशुल्क शिक्षण दिले जात आहे.
सध्या ज्ञान घरमध्ये एकूण 60 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. रत्ना गिलची आजी लुधियानात राहते. सुट्या असताना वर्षातून एकदाच रत्ना भारतात येऊ शकते. परंतु, वर्षभर तिचे या संस्थेच्या कामकाजाकडे लक्ष असते. अमेरिकेत शिक्षण सुरु असतानाही ती या संस्थेकडे दुर्लक्ष करीत नाही, हे विशेष.
60 गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण
लुधियानात आजी अमृत कौर गिल यांच्या घरी आल्यावर रत्ना शेजारी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना चित्रकला, म्युझिक आणि डान्स शिकवत असे. तेव्हा ती केवळ 13 वर्षांची होती. रत्ना अमेरिकेतून आली असल्याचे समजल्यावर शेजारी राहणारी मुले तिच्याकडे शिकण्यासाठी येत. पण याला आजीचा विरोध होता. विश्रांतीसाठी आलेल्या रत्नावर जबाबदारी टाकू नये, असे आजीला वाटत होते. पण मुलांचे हिरमुसलेले चेहरे बघून रत्नाने स्वतःच पुढाकार घेतला. 2008 च्या सुट्यांमध्ये रत्ना वडीलांसोबत भारतात आली होती तेव्हा संस्थेची नोंदणी करण्यात आली. तेव्हा केवळ पाच विद्यार्थी शिकायला होते. आता त्यांची संख्या वाढून 60 झाली आहे.
मुलांचा आत्मविश्वास वाढावा हा उद्देश
गरीब मुलांना शिक्षण देण्यासह त्यांचा आत्मविश्वास वाढावा, असा रत्नाचा उद्देश आहे. सुट्यांमध्ये भारतात आल्यावर ती मुलांना अमेरिकेतील काही नवीन गोष्टी सांगण्यासह त्यांचा आत्मविश्वास वाढण्यावर भर देते. रत्ना भारतात नसताना तिची आजी अमृत कौर संस्थेचे काम बघते. त्यांनी दोन शिक्षक हायर केले आहेत. मालवा खालसा सीनिअर सेकंडरी स्कूलमधील हे शिक्षक असून ते दररोज दोन तास मुलांना शिकवायला येतात. तिचे आजोबा मालवा कॉलेजमध्ये उपाध्यक्ष होते. हॉवर्ड विद्यापिठात अर्थशास्त्राचा अभ्यास करीत असलेल्या रत्नाला शिक्षक व्हायचे आहे.
पुढील स्लाईडवर बघा, रत्ना गिलचा क्लास... तिचे फेसबुकवरुन घेतलेले फोटो...