आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मगलर महिलेच्या पोटात 4.5 कोटींचे कॅप्सूल; स्फोट झाल्याने मृत्यू्

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत्‍यू महिलेवर अंत्‍यसंस्‍कार करताना. - Divya Marathi
मृत्‍यू महिलेवर अंत्‍यसंस्‍कार करताना.
अमृतसर (पंजाब) पाकिस्तानच्‍या सीमेवर 26 जूनला बेशुध्‍द अवस्‍थेत सापडलेल्‍या गॅम्बिया येथील एका महिलेचा दुसर्‍याच दिवशी रुग्‍णालयात मृत्‍यू झाला. शवविच्‍छेदनाच्‍या अहवालानुसार या महिलेच्‍या पोटात 4.5 कोटी रुपयांचे 50 ड्रग कॅप्सूल आढळून आले असून, त्‍यांचा स्‍फोट झाल्‍याने तिचा मृत्‍यू झाला. परिणामी, ही महिला स्‍मगलर असल्‍याच्‍या बाबीला पुष्‍टी मिळाली आहे. कॅलथा टिवाना (28) असे तिचे नाव आहे. व्‍यावसायिक व्‍हीसावर ती भारतात आली होती.
सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांना 26 जनूला पाकिस्तान सीमेवर एक गॅम्बियन महिला बेशुध्‍द़ अवस्‍थेत सापडली होती. दुसर्‍याच दिवशी तिचा रुग्‍णालयात मृत्‍यू झाला. गॅम्बिया दुतावासाकडून परवानगी मिळाल्‍यानंतर शनिवारी तिचे शवविच्‍छेदन करण्‍यात आले. त्‍यातून ती ड्रग्ज स्मगलर असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. शिवाय तिने पोटात दडवलेल्‍या ड्रग्ज कॅप्सूलमुळे तिचा मृत्‍यू झालाचेही निदान झाले. येथील एका स्‍मशानभूमीन तिला दफन करण्‍यात आले.
असे आहे प्रकरण
सुरक्षा रक्षकांना 26 जूनला पाकिस्तान सीमेवर एक विदेशी महिला संशयास्‍पदरीत्‍या फि‍रताना आढळली होती. दरम्‍यान, ती वारंवार चक्‍कर येऊन खाली कोसळत होती. सुरक्षा रक्षक तिच्‍या मदतीसाठी पुढे आले तर तिने त्‍यांना जवळ येऊ दिले नाही. नंतर रक्षकांनीच तिला रुग्‍णालयात भरती केले. 27 जूनला तिचा मृत्‍यू झाला. दरम्‍यान, तिचे शवविच्‍छेदन करण्‍यासाठी गॅम्बिया दुतावासाकडून सहा दिवसानंतर परवानगी मिळाली. शनिवार, 3 जुलैला तिचे शवविच्‍छेदन करण्‍यात आले. यात तिच्‍या पोटात 50 ड्रग कॅप्सूल आढळून आलेत. त्‍यातील 28 कॅप्‍सूल पोटातच फुटले यामुळेच तिचा मृत्‍यू झाला.
अंत्‍यसंस्‍कारासाठी अडचण
तिच्‍यावर अंत्‍यसंस्‍कार करण्‍यासाठी पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागला. अनेक स्‍मशानभूमीने त्‍यासाठी परवानगी दिली नाही. शेवटी विनंतीवरून एका स्‍मशानभूमी प्रशासनाने यासाठी तयारी दाखवली.
कॅप्‍सूल होते साडे चार कोटींचे
पोस्टमॉर्टेममध्‍ये मिळलेल्‍या 50 ड्रग कॅप्सूलची आंतराष्‍ट्रीय बाजारपेठेत तब्‍बल साडे चार कोटी रुपये किंमत आहे. तिच्‍या मृत्‍यू बाबत पोलिसांनी कुटुंबाला कळवले होते. पण, मृतदेह घेण्‍यास कोणीच आले नाही.