आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bride Groom Demanded Dowry During Marriage, Bride Return Him

लग्नमांडवापर्यंत पोहोचले फेसबुकवरचे प्रेम, त्याने मागितला हुंडा, तिने परतवली वरात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो ओळ- नवरदेव भुपिंदर कुमार आणि नवरी ज्योती भगत.)
अमृतसर (पंजाब)- दोन वर्षांपूर्वी भुपिंदर आणि ज्योती यांची फेसबुकवर ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री आणि ओघाओघाने प्रेम झाले. अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाची तारीख ठरली. लग्नमंडप सजला. पण वरात मांडवात आल्यावर भुपिंदरने पाच लाख रुपये हुंडा देण्याची विचित्र मागणी केली. यावर ज्योती आणि तिचे कुटुंबीय फार संतापले. ज्योतीने वरात परत पाठवली. या प्रकरणी पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे.
भुपिंदरने न्युझिलंडना नेण्याचे ज्योतीला दाखवले होते स्वप्न
भुपिंदरने ज्योतीला सांगितले होते, की तो मुळचा उत्तर प्रदेशातील फैजाबादचा राहिवासी आहे. सध्या न्युझिलंडला नोकरीत करीत आहे. लग्नानंतर तुलाही न्युझिलंडला राहावे लागेल. त्यावर ज्योतीचा विश्वास बसला. दोघांमधील प्रेम वाढत गेले. ज्योतीने भुपिंदरची माहिती आईवडीलांना दिली. तिच्या वडीलांनी भुपिंदरशी बोलून लग्नाला सहमती दिली. त्यानंतर लग्नाची मुहूर्त ठरवण्यात आला. लग्नाच्या एक महिन्यापूर्वीपासून तो म्हणत होता, की जर तुला न्युझिलंडला यायचे असेल तर नऊ लाख रुपये खर्च येईल. पण एवढे पैसे देऊ शकत नाही असे ज्योतीने स्पष्ट केले होते.
या विषयावर दोघांमध्ये चर्चा सुरु असताना लग्नाची तारीख समिप आली. ज्योतीचे वडील दिड लाख रुपये देण्यासाठी तयार झाले. त्यानंतर लग्नाच्या दिवशी भुपिंदर वरात घेऊन आला. त्यानंतर आरोपीने मागणी केली, की मला पाच लाख रुपये द्या. नंतरच सप्तपदी होईल. नाहीतर लग्न मोडले असे समजा. त्यानंतर लग्नमंडपात एकच गोंधळ उडाला. ज्योतीने लगेच वरात परत नेण्याचे भुपिंदरला खडसावून सांगितले. त्यानेही वरात परत नेली. जाताना लग्नमांडवाबाहेर लागलेला दोघांचा फोटो असलेला फलक सोबत घेऊन गेला.
पुढील स्लाईडवर बघा, भुपिंदरने परत नेली वरात... ज्योतीला असा झाला मनस्ताप....