आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातच्या बंटी आणि बबलीने अमिताभच्या नावे प्रतिष्ठितांना लाखोंना गंडवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोहाली (पंजाब)  -पंजाबमधील मोहाली येथे महानायक अमिताभ बच्चन यांच्या नावावर १२ हून अधिक लोकांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. लोकांना मोठमोठी स्वप्ने दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या गुजरातच्या हॅरी भट्ट ऊर्फ अविनाश भट्ट याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. 

या प्रकरणात माेहालीतील डॉ. दीप्ती शास्त्री यांचे नाव गुंतले असून त्यांनाही आरोपी करण्यात आले. ही तक्रार लालडू यांच्या कॉलेज व्यवस्थापनाने केली असून दीप्तीनेच हॅरी भट्टशी त्यांची भेट घडवून आणली. आता दीप्तीनेच भट्ट दांपत्याविरुद्ध तक्रार दिली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात येथील हॅरी भट्ट, त्याच्या पत्नीविरोधात लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार कॉलेजच्या व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. या डॉक्टर दांपत्याने अमिताभ बच्चन यांना महाविद्यालयात आणण्यासाठी आणि त्यांच्यासोबत जेवण करण्यासाठी पैसे घेण्यात आले होते.  आता दोघेही फरार झाले आहेत. सर्व संचालकांशी हॅरी भट्ट यांची  भेट घालून देणाऱ्या डॉ. दीप्ती शास्त्री यांनाही आरोपी करण्यात आले. 

हॅरी भट्ट गुजरातचा रहिवासी  :  हॅरी भट्ट याचे खरे नाव हिरेण विजेंद्रभाई वैध असे आहे. तो गुजरातचा राहणारा आहे. दीप्ती यांनी पाेलिसात तक्रार दिल्यानंतर फर्निचर, केटरिंग व्यावसायिक, हिमाचलमधील एक मॉडेलिंग करणारी तरुणी, मोबाइल शाॅपी, कॉलेज व्यवस्थापन यांनी तक्रारी दिल्या आहेत. 
 
याशिवाय, पतियाळातील पॉलीवूड कलावंत हावी धालीवाल यांनी २४ लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली. सिटी खरड पोलिस ठाण्यात हॅरी व त्याची पत्नी, बँक व्यवस्थापक व एक जणाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.  आणि हॅरीचा कथालेखक गौरव आणि चालक जस्सी यास पोलिसांनी पकडले. जस्सीने सांगितले, हॅरीनेच माझी फसवणूक केली आहे.
बातम्या आणखी आहेत...