आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांच्या हट्टापायी 500 एकरांतील गव्हाचे पीक धोक्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिरोजपूर - उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली वॉटर बस वादात सापडली आहे. विधानसभा निवडणुकीत राजकीय फायदा व्हावा म्हणून हरिके बेटाची पाण्याची पातळी वाढवण्यासाठी भाक्रा नांगल धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. यात वॉटर बस तर चालली; पण पाणी पातळी वाढल्याने भारत-पाक सीमेजवळील फिरोजपूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले.

वॉटर बसचे उद्घाटन झाल्यानंतर भाक्रा-नांगल धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले. यामुळे मंगळवारी पाण्याची पातळी घटली. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या हट्टापायी १० कोटी रुपये खर्चून चालू झालेली वॉटर बस पुन्हा बंद करण्यात आली. पर्यटन विभागाचे संचालक नवज्योतपाल सिंग रंधावा यांनी पाण्यात चालणारी ही बस बंद केली. कारण सध्या या सरोवराची पाणीपातळी कमी झाली आहे. बस चालवण्यासाठी किमान साडेचार मीटर पाणीपातळी हवी आहे. सध्या डोंगरावर बर्फवृष्टी होत असल्याने तापमान शून्य अंशाच्या खाली गेलेले आहे. फेब्रुवारी -मार्चमध्ये जेव्हा बर्फ वितळेल तेव्हा सरोवराची पाणी पातळी वाढेल. त्यानंतर पाण्यात चालणारी बस सुरू केली जाईल.

राज्य सरकारने डोंगरावरील बर्फ वितळण्याची आणि नैसर्गिकरीत्या हरिके बेटावरील पाणी पातळी वाढण्याची वाट पाहिली असती तर मार्च २०१७ पर्यंत थांबावे लागले असते; पण पुढच्या महिन्यात म्हणजे जानेवारीत विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांनी उपमुख्यमंत्री सुखबीर बादल यांच्या २०१४ मध्ये पाण्यात चालणाऱ्या बसच्या घोषणेचा राजकीय मुद्दा बनवू नये यासाठी हा अाटापिटा करण्यात आला.

अभियंत्यास बोलण्यास बंदी : सरोवरात विनाकारण पाणी सोडण्यात आल्याच्या संदर्भात हरिके मुख्य कार्यालयातील कार्यकारी अभियंता विजयपालसिंग यांच्याशी संपर्क साधला असता ते रजेवर होते, मात्र सिंचन विभागाने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे मान्य केले.
आधी चाचणी आणि मग उद्घाटनासाठी साेडले जादा पाणी
११ डिसेंबर रोजी पाण्यात चालणाऱ्या बसची चाचणी घेण्यात आली. तेव्हा हरिके बंदरात पाणी कमी असल्याने ती यशस्वी ठरली नाही. यानंतर १२ डिसेंबर रोजी भाक्राचे दरवाजे उघडण्यात आले. १३ डिसेंबर रोजी पुन्हा पाण्यात चालणाऱ्या बसचे उद््घाटन करण्यात येणार होते तेव्हा भाक्रामधून पुन्हा पाणी सोडण्यात आले. यामुळे सतलज नदीच्या अाजूबाजूच्या गावांतील सुमारे ५०० एकर शेतात पाणी शिरले. या भागातील शेतकऱ्यांनी सांगितले, गव्हाच्या आणि भाजीपाल्याच्या जमिनीत पाणी शिरले. नदीत पाणी सोडल्याने आमची पिके बुडाली. त्यात मोठे नुकसान झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...