आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्ण मंदिरावर हल्ल्याची दहशतवाद्यांची धमकी, सुरक्षा व्‍यवस्‍थेत केली वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्‍लामिक दहशतवादी संघटनेने अमृतसर येथील सुवर्ण मंदिरावर हल्ला करण्याची धमकी दिल्‍यामुळे सुरक्षा व्यवस्था वाढवण्‍यात आली आहे. सुरक्षेसाठी टास्‍क फोर्स तैनात करण्‍यात आले असून मंदिरात प्रवेश करणा-या प्रत्‍येकाची कसून तपासणी केली जात आहे.
इस्‍लामिक दहशतवाद्यांनी मंदिरावर हल्‍ला करणार असल्‍याची धमकी दिल्‍यामुळे सुरक्षा समितीने मंदिराची सुरक्षा वाढवण्‍याचा निर्णय घेतला असल्‍याचे कमिटीचे सचिव अवतारसिंग मक्कड यांनी सांगितले. गुप्‍तचर विभागाकडून माहिती मिळाल्‍यानंतर तत्‍काळ सुरक्षा वाढवण्‍याचा निर्णय घेतला असल्‍याचे अवतारसिंग यांनी सांगितले.
मंदिराच्‍या आवारात बॅग घेऊन जाणा-या व्‍यक्तीची आता तपासणी केली जाणार आहे. मंदिराचा आवारात सीसीटीव्‍ही कॅमेरे लावण्‍यात आले आहेत. पोलिस आयुक्‍त जतिंदरसिंग औलख यांनी सांगितले, की काही दिवसांपूर्वी दरबार साहिब यांच्‍या मॅनेजरला धमकीवजा फोन आला होता. फोन करणा-याने पैश्‍यांची मागणी केली होती.

पुढील स्‍लाईडवर पाहा सुप्रसिद्ध सुवर्ण मंदिराचे फोटो...