आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ex army Man Subheg Singh Helped Bhindrawala In Operation Blue Star

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हा आहे सुभेगसिंग, याच्यामुळे ऑपरेशन ब्लू स्टार लष्कराला गेले जड, होता लष्कराचा वरिष्ठ अधिकारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृतसर (पंजाब)- ऑपरेशन ब्लू स्टारला 31 वर्षे पूर्ण झाली आहेत. आजही या लष्करी कारवाईची आठवण आली तरी अंगावर काटा उभा राहतो. जरनैलसिंग भिंडरावाल्याबाबत सर्वांनाच माहिती आहे. पण भारतीय लष्करातून बडतर्फ करण्यात आलेला सुभेगसिंग भिंडरावाल्याची खरी ताकद होता. सुभेगसिंग जर भिंडरावाल्याच्या बाजूने उभा झाला नसता तर पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती खराब झाली नसती. ऑपरेशन ब्लू स्टार करण्याची गरजही पडली नसती.
निवृत्त होण्याच्या एका दिवसापूर्वी सुभेगसिंगला 2500 रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी लष्करातून तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले होते. त्याचे कोर्ट मार्शलही करण्यात आले नव्हते. परंतु, त्यानंतर न्यायालयाने त्याच्यावरील आरोप फेटाळून लावले. निवृत्तीच्या एक दिवस आधी बडतर्फ केल्याने तो प्रचंड चिडलेला होता. या अपमानाचा त्याला बदला घ्यायचा होता. त्यामुळे त्याने भिंडरावाल्याला मदत केली. लष्करातील त्याचा सर्व्हिस रेकॉर्ड चांगला होता.
भारतीय लष्करातून बडतर्फ केल्यानंतर सुभेगसिंग भिंडरावाल्याच्या बाजूने उभा राहिला. त्याचा विश्वासू झाला. त्याने भिंडरावाल्याच्या समर्थकांना लष्करी प्रशिक्षण देण्यास सुरवात केली. लष्कराने ऑपरेशन ब्लू स्टार सुरु केले तेव्हा वाटले होते, की काही तासांत ही कारवाई संपेल. यात एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होणार नाही.
दुसरीकडे लष्कराकडून अशा स्वरुपाची कारवाई केली जाऊ शकते, याची माहिती भिंडरावाल्याला मिळाली होती. त्याने जोरदार संघर्षाची जवळपास महिन्याभरापासून तयारी केली होती. यात सुभेगसिंग महत्त्वाची भूमिका बजावत होता. अकाल तख्तसह संपूर्ण सुवर्ण मंदिरात प्रशिक्षण घेण्यात आले होते. त्यामुळे लष्कराला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. यात लष्कराचे 85 कमांडो शहिद झाले. मंदिराच्या परिसरात रक्ताचे पाट वाहिले होते. सर्वत्र मृतदेह विखुरलेले दिसून येत होते. एका रात्रीत ही कारवाई संपेल असे प्रारंभी वाटले होते. पण चक्क तीन दिवस कारवाई सुरु राहिली. अकाल तख्तचे मोठे नुकसान झाले. शीख बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या.
पुढील स्लाईडवर वाचा, सुवर्ण मंदिराचा असा करण्यात आला होता अभेद्य किल्ला....लष्कराला सुरवातील मोठे नुकसान उचलावे लागले... त्यानंतर रणगाड्यांनी केला प्रहार....इंदिरा गांधी यांनी भिंडरावाल्याला लिहिलेली पत्रे...