आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: सात वर्षाच्‍या चिमुकलीवर बलात्‍कार, मुलीच्‍या पित्‍याने छाटले आरोपीचे दोन्‍ही हात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भटींडा (पंजाब)- एका नराधमाने अवघ्‍या सात वर्षाच्‍या चिमुकलीवर बलात्‍कार केला. त्‍यानंतर संतापलेल्‍या मुलीच्‍या वडिलांनी मंगळवारी आरोपीचे दोन्‍हीही हात छाटल्‍याची धक्‍कादायक घटना भटींडा जिल्‍ह्यात घडली आहे. रक्‍ताच्‍या थारोड्यात शेतात पडलेल्‍या या आरोपीला काही लोकांनी हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल केले. तेथून त्‍याला फरीदकोट मेडिकल कॉलेजमध्‍ये हलवण्‍यात आले. पीडित मुलीच्‍या पित्‍याने असा रचला कट....

- आरोपी नराधमारे 2014 मध्‍ये सात वर्षाच्‍या मुलीवर बलात्‍कार केला होता.
- कोटली अबलूमध्‍ये भट्टीवर काम करणा-या परमिंदरवर आरोप आहे की, त्‍याने साेबत काम करणा-या कामगाराच्‍या मुलीवर बलात्‍कार केला.
- तक्रारीनंतर नंदगड पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला. आरोपी तुरुंगातही होता. तीन महिन्‍यांपूर्वी तो बाहेर आला होता.
- हा खटला कोर्टात चालू होता. आरोपी आणि पीडित मुलीचे वडील मंगळवारी कोर्टात गेले होते.
- मुलीच्‍या पित्‍याने परमिंदरला कोर्टाच्‍या बाहेर आल्‍यानंतर प्रकरण आपसात घेऊ असे सांगितले.
- मुलीचा पिता आरोपीला बाईकवर बसवून झुंबा गावाच्‍या दिशेने निघाला.
- तेथे त्‍याने आरोपीला झाडाला बांधून त्‍याची जोरदार पिटाई केली. त्‍यानंतर त्‍याचे दोन्‍ही हात कापून तो फरार झाला.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, अशा अवस्‍थेत हॉस्‍पिटलमध्‍ये आहे आरोपी....